अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठान आयोजित पार्थ स्पोर्ट्स लीग अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा संपन्न…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठान आयोजित पार्थ स्पोर्ट्स लीग अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा संपन्न…

पाथर्डी/प्रतिनिधी : अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठान,पाथर्डी आयोजित पार्थ स्पोर्ट्स लीग २०२२ अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा शनिवारी उत्साहात पार पडल्या.या

सर्वाधिक दूध पुरवठा करणार्‍या संस्था व कृत्रिमरेतकांचा गौरव :परजणे
LokNews24 Prime Time LIVE | चारित्र्याचा संशय घेणाऱ्या सासऱ्याचा सूनेकडून खून | loknews24
AhmedNagar : बस बंद ? शाळा सुरु ..

पाथर्डी/प्रतिनिधी : अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठान,पाथर्डी आयोजित पार्थ स्पोर्ट्स लीग २०२२ अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा शनिवारी उत्साहात पार पडल्या.या स्पर्धेत शहरातील १६ शाळांनी सहभाग घेतला असून ३४० विद्यार्थी सहभागी झाले.यावेळी सर्व १६ सहभागी शाळांना डिजिटल बोर्ड वितरित करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, संस्थेचे सदस्य व माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, संस्थेचे सदस्य बाळासाहेब कचरे, नगरसेवक प्रसाद आव्हाड,दत्ता सोनटक्के, आप्पासाहेब बोरुडे, शेषराव कचरे, सुरेशराव मिसाळ, प्रशांत शेळके, मुख्याध्यापक शरद मेढे अनुजा कुलकर्णी व शहरातील सर्व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

या स्पोर्ट लीगमध्ये ४०मीटर धावणे, ३० मीटर धावणे, फुगे फोडणे ,पोत्यांची शर्यत, संगीत खुर्ची ,प्रश्नमंजुषा, बास्केटबॉल, थ्रोबॉल इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व आकर्षक कार्टून पेन्सिल भेट देण्यात आली.तसेच विविध क्रीडा प्रकारातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त ५८ विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्व शाळां मधील विद्यार्थ्यांनी ड्रिलसंचालन व्यासपीठावरील मान्यवर,सर्व शिक्षक व पालक आश्चर्यचकित झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गायके यांनी केले तर आभार शरद मेढे यांनी मानले. सर्व स्पर्धा पार पाडण्यासाठी प्रा.विजय देशमुख, रावसाहेब मोरकर,सतीश डोळे, प्रमोद हंडाळ,सचिन शिरसाठ , दीपक राठोड ,जयश्री एकशिंगे, मनीषा गायके,आशा बांदल ,ज्योती हम्पे,राधिका सरोदे, जयश्री खोरदे, कीर्ती दगडखैर ,सतीश बोरुडे, ऋषिकेश मुळे, दादासाहेब उदमले, योगेश इधाटे यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS