नाशिकमध्ये 2 बडया अधिकार्‍यांकडे कोटयावधींचे घबाड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकमध्ये 2 बडया अधिकार्‍यांकडे कोटयावधींचे घबाड

नाशिक/प्रतिनिधी : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीने केलेल्या कारवाईत दोन बडया अधिकार्‍यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या घरी टाकलेल

या, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे.. भास्कर जाधव यांची भावनिक साद
निर्यात बंद असल्याने फळांचा राजा मिळेल स्वस्तात
राहुरी तालुक्यात दोन घरावर वीज कोसळल्याने नुकसान

नाशिक/प्रतिनिधी : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीने केलेल्या कारवाईत दोन बडया अधिकार्‍यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या घरी टाकलेल्या छाप्यात कोटयावधींचे घबाड सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. आदिवासी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेशकुमार बागूल यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जीएसटीच्या अधिक्षकाला अटक केली आहे. रवींद्र चव्हाणके असे या अधिकार्‍याचे नाव आहे.
लाचलुचपत विभागाच्या कारवाईने आदिवासी विभाग आणि जीएसटी विभागात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत, आदिवासी विभागाचे कार्यकारी अधिकारी दिनेशकुमार बागूल यांच्याकडे कोट्यवधी रुपयांचे घबाड हाती लागल्याची माहिती आहे. अँटी करप्शनची रेड पडल्याचे कळताच, या अधिकार्‍याने दस्ताऐवज असलेली बॅग फेकल्याची माहिती एसीबीच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. आता दस्तऐवज आणि मालमत्तेची मोजदात अद्यापही सुरू आहे. काल रात्रीपासून ही कारवाई सुरु असल्याची माहिती आहे. बागुल यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता सापडेल असे सांगण्यात येते आहे. या कारवाईतील पैशांचा एक फोटोही हाती लागला आहे.

COMMENTS