आदिवासी तरुणाला मासेमारी केल्याने गरम लोखंडी सळईचे चटके.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदिवासी तरुणाला मासेमारी केल्याने गरम लोखंडी सळईचे चटके.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धक्कादायक प्रकार

अमरावती प्रतिनिधी- अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आदिवासी तरुण मासेमारी करत होता. वनविभागात नियमानुसार मासेमारी करता

कोरोनाची दुसरी लाट किती काळ टिकणार? ; तज्ज्ञांत एकवाक्यता नाही; 15 दिवसांपासून तीन महिन्यांचा वेळ
या आमदाराला तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा | LOK News 24
ताडोबा सफारी प्रकल्पाची 12 कोटींची फसवणूक

अमरावती प्रतिनिधी– अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आदिवासी तरुण मासेमारी करत होता. वनविभागात नियमानुसार मासेमारी करता येत नाही. दरम्यान एक आदिवासी तरुण मासेमारी करताना वनकर्मचाऱ्यांना दिसला. त्यामुळे वनकर्मचाऱ्यांना राग आला. त्यांनी त्या तरुणासोबत अतिशय क्रूरतेने वागणूक दिली. या वन कर्मचाऱ्यांनी गरम लोखंडी सळईने चटके दिल्याचा आरोप आदिवासी तरुणानं केला आहे. या प्रकाराने आदिवासींमध्ये खळबळ माजली त्यामुळे वनकर्मचाऱ्यांचे चांगले धाबे दणाणले आहे. या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS