मटण दिले नाही म्हणून दोन गटात तुफान धुमश्‍चक्री ;  हाणामारीत आठ जखमी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मटण दिले नाही म्हणून दोन गटात तुफान धुमश्‍चक्री ; हाणामारीत आठ जखमी

मटण दिले नाही, या क्षुल्लक कारणावरून दोन गट एकमेकांना समोरासमोर भिडले.

देवळाली प्रवरा नगरपालिकेत स्वातंत्र्य दिन उत्साहात
केडगाव येथून अल्पवयीन मुलांचे अज्ञाताकडून अपहरण
संगमनेरात गौ ग्राम परिक्रमा काढून वसुबारस साजरी

अहमदनगर/प्रतिनिधी-मटण दिले नाही, या क्षुल्लक कारणावरून दोन गट एकमेकांना समोरासमोर भिडले. या हाणामारीत लोखंडी गज, कुर्‍हाड, दगड व  काठीचा वापर करीत एकमेकांना केलेल्या मारहाणीत आठजण जखमी झाले. ही घटना नगर तालुक्यातील कवडगाव शिवारातील बालेवाडी येथे घडली. 

याबाबतची माहिती अशी की बाबासाहेब पालवे (राहणार बाळेवाडी, कवडगाव) यांनी अनिल पालवे यास आम्हाला मटण का दिले नाही असे विचारले. त्याचा राग येऊन अनिल पालवे, गणेश पालवे, दत्तू पालवे, राजेंद्र पालवे, प्रकाश पालवे, रोहित पालवे, सीमा पालवे (सर्व राहणार बाळेवाडी, तालुका नगर) यांनी मंगल पालवे, बाबासाहेब पालवे, मिराजी पालवे, धनेश्‍वर पालवे यांना कुर्‍हाड, लोखंडी गज व दगडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत मंगल पालवे, बाबासाहेब पालवे, मिराजी पालवे, धनेश्‍वर पालवे हे जखमी झाले. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी मंगल पालवे यांच्या फिर्यादीवरून भादवि कलम 307, 143, 147, 148, 149, 504 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, दुसर्‍या फिर्यादीत सीमा पालवे (राहणार बाळेवाडी, कवडगाव) यांनी म्हटले आहे की, चंद्रकांत उर्फ दाद्या सानप याने आम्हाला मटण का दिले नाही असे म्हणून शिवीगाळ करून परमेश्‍वर उर्फ बंड्या पालवे, बाबासाहेब पालवे, धनेश्‍वर पालवे, मंदाबाई पालवे, बाळासाहेब सानप, महादेव घुले, नवनाथ घुले (सर्व राहणार बाळेवाडी, कवडगाव, तालुका नगर) यांनी गणेश पालवे, गणेश पालवे, पोपट पालवे, पुष्पा पालवे (सर्व राहणार काळेवाडी) यांना कुर्‍हाडीने, लाकडी काठीने, लोखंडी गजाने, दगडाने बेदम मारहाण करीत खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी भादवि कलम 307, 143, 147,  148, 149,504 प्रमाणे खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राऊत करीत आहेत.

COMMENTS