Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. जयंत पाटील यांनी एसटीची बस चालविल्याप्रकरणी आगार प्रमुखासह चालकावर कारवाईची भाजपाची मागणी; माझ्यावर खुशाल गुन्हा दाखल करा : आ. जयंत पाटलांचे प्रत्युत्तर

इस्लामपूर / प्रतिनिधी : स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव दिनी आ. जयंत पाटील यांनी इस्लामपूर शहरात बस चालविली हि गंभीर बाब असून सरकारी व सार्वजन

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे 733 नवीन रुग्ण
बेरोजगारांना पुढच्या वर्षापर्यंत मिळणार ‘त्या’ योजनेचा लाभ
सोनगाव परिसरात बिबट्याची दहशत सुरू; वनखात्याचे मात्र दुर्लक्ष

इस्लामपूर / प्रतिनिधी : स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव दिनी आ. जयंत पाटील यांनी इस्लामपूर शहरात बस चालविली हि गंभीर बाब असून सरकारी व सार्वजनिक प्रवाशी वाहतुक बस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चालक म्हणून नियुक्ती नसताना बस चालविणे हे कायद्याने गुन्हा आहे. इस्लामपुर आगार प्रमुख व संबधीत बस चालकांना जबाबदार धरुन त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करुन त्यांना निलंबीत करण्याची मागणी सांगलीचे विभागीय नियंत्रक यांच्यासकडे इस्लामपूर विधानसभा मतदार संघ भाजपाने केली आहे.
यावेळी विभागीय वाहतुक अधिकारी श्रीमती वृषाली भोसले यांना निवेदन देण्यात आले. भोसले म्हणाल्या हि बाब गांभीर्याने घेतली असून त्याचा अहवाल इस्लामपूर आगाराकडून मागविण्यात आला आहे. अहवाल आला की यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आगारातील विठाई बस (एम. एच. 13 सी. यु. 8122) सजविण्यात आली होती. दरम्यान आ. जयंत राजाराम पाटील यांची परिवहन महामंडळाकडे बस चालकाची नियुक्ती नाही. त्यांच्याकडे बस चालक होण्यासाठी असलेला आरटीओचा बॅच बिल्ला नाही. जड वाहन चालविण्याचा परवाना तसेच कोणताही अनुभव नसताना इस्लामपूर शहरातून बस चालविली. या घटनेची चित्रफित सोशल मिडिया व वृत्त वाहिन्यांवर प्रसिध्द झाल्या. ही बाब अत्यंत गंभीर व बेकायदेशीर आहे. महामंडळाकडील सरकारी व सार्वजनिक वापराचे वाहन नियुक्ती नसताना चालविण्यास देणे बेकायदेशीर आहे. ही बाब गंभीर असून संबंधीत आगार प्रमुख श्रीमती शर्मिष्ठा पोळ व संबंधीत बसचालक संदीप चिखलकर यांच्याकडे कोणताही अधिकृत आदेश नसताना बस चालविण्यास दिली. याप्रकरणी संबंधीत आगार प्रमुख श्रीमती शर्मिष्ठा पोळ व बस चालक संदीप चिखलकर यांना याबाबत जबाबदार धरून त्यांच्यावर तात्काळ कायदेषीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे दिली.
वाळवा तालुका भाजपा अध्यक्ष धैर्यशील मोरे म्हणाले ही घटना अत्यंत गंभीर असून पोलीस निरिक्षक चव्हाण व परिवहन महामंडळाच्या अधिकार्‍यांनी माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्याची भुमिका घेतली आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक शशीकांत चव्हाण यांनी हा गुन्हा दाखल करुन घेण्यास हलगर्जीपणा अथवा कर्तव्यात कसूर केल्यास त्यांच्या चुकीच्या कार्यपध्दतीचा अहवाल राज्य सरकारकडे करणार आहे. सांगली येथे निवेदन देताना वाळवा तालुका भाजपा अध्यक्ष धैर्यशील मोरे, भाजपा ओबीसी सेलचे अध्यक्ष मधुकर हुबाले, भाजपाचे सरचिटणीस यदुराज थोरात उपस्थित होते.

माझ्यावर खुशाल गुन्हा दाखल करा : आ. जयंत पाटलांचे प्रत्युत्तर
इस्लामपूर / प्रतिनिधी : वाहन चालविण्याचा परवाना माझ्याकडे आहे. त्यामुळे एसटी बस चालवून देशाचा अमृत महोत्सव साजरा करणे गुन्हा असेल तर सरकारने माझ्यावर खुशाल कारवाई करावी असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी दिले आहे.
सोमवार, दि. 15 ऑगस्ट रोजी येथील तहसील कार्यालय परिसरात सजून आलेल्या इस्लामपूर आगाराच्या विठाई बसचे सारथ्य जयंत पाटील यांनी केले. राजारामबापू साखर कारखाना रस्त्यावर त्यांनी ही बस चालविली. त्याची समाज माध्यमावर मोठी चर्चा झाली. मात्र काल, बुधवारी भाजपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी त्यांच्या या कृतीवर नियमबाह्य आणि बेकायदेशीर असल्याचा आक्षेप नोंदवत थेट पोलिसांना निवेदन देत आ. जयंत पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी करत खळबळ उडवून दिली.
भाजपच्या निवेदनात एसटी महामंडळात त्यांची नियुक्ती आहे का? त्यांच्याकडे प्रादेशिक परिवहन विभागाकडून दिला जाणारा बॅच-बिल्ला आहे का? अवजड वाहन चालविण्याचा परवाना आहे का? अशा प्रश्‍नांची सरबत्ती करत आमदार पाटील यांनी सार्वजनिक वापरातील वाहन चालवून रस्त्यावरील पादचारी आणि इतर वाहनांना धोका उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचा आक्षेप ठेवण्यात आला होता. त्यातच आता राज्यात पुन्हा भाजप सत्तेत आल्याने कार्यकर्त्यांनीही गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रह धरला होता.
या पार्श्‍वभूमीवर आ. जयंत पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले. माझ्याकडे परवाना आहे. तसेच बस चालवून देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आनंद घेतला यात चुकीचे काय आहे? असा प्रतिसवाल करत बस चालविणे हा गुन्हा असेल तर सरकारने कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

…………….

COMMENTS