आईला मारहाण केल्याच्या कारणावरून मुलाने बापाचा घेतला जीव.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आईला मारहाण केल्याच्या कारणावरून मुलाने बापाचा घेतला जीव.

याप्रकरणी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल

सोलापूर प्रतिनिधी - दक्षिण सोलापूर(South Solapur) तालुक्यातील अंत्रोळीत शिवाजी थोरात(Shivaji Thorat) यांने आपल्या पत्नीस घरगुती भांडणाच्या रागातून क

पैशाच्या वादातून केला मोठ्या भावाचा खून
पत्नीबद्दल अपशब्द वापरल्या रागातून तरुणाची हत्या.
वाद सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याची हत्या

सोलापूर प्रतिनिधी – दक्षिण सोलापूर(South Solapur) तालुक्यातील अंत्रोळीत शिवाजी थोरात(Shivaji Thorat) यांने आपल्या पत्नीस घरगुती भांडणाच्या रागातून कुर्‍हाडीने पाठीवर वार केला होता. आईला कुर्‍हाडीने मारुन जखमी केले म्हणून मयत शिवाजी थोरात यांचा मुलगा तानाजीने वडिलांना झाडाला बांधून काठीने जबर मारहाण केली. त्याचबरोबर बहिणीला कुर्‍हाडीने मारल्याचा राग मनात धरुन मयताचा मेव्हुणा भीमराव जाधव ने ही मेवण्यास शिवीगाळ करत लाकडी काठीने दोन्ही हात,पाय,मांडी आणि छातीवर मारहाण करून जीवे ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींवर आयपीसी कलम 302,177, 342, 504, 34 प्रमाणे मंद्रूप पोलीसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

COMMENTS