राज्यात कोरोनाला सुरुवात झाल्यापासून बालकांच्या पोषणाकडे दुर्लक्ष झाल्याचे आपल्याला कबुल करावे लागणार आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट आणि चिखलदरा परि
राज्यात कोरोनाला सुरुवात झाल्यापासून बालकांच्या पोषणाकडे दुर्लक्ष झाल्याचे आपल्याला कबुल करावे लागणार आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट आणि चिखलदरा परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला तो बालमृत्यूमुळे. गेल्या तीन महिन्यात मेळघाटातील 53 बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बालकांचे कुषोणाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. केंद्राच्या आणि राज्यांच्या डझनभराच्या वर योजना असतांना, या मुलांपर्यंत पोषक आहार का पोहचू शकला नाही. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा व धारणी तालुका हा ‘मेळघाट’ म्हणून ओळखला जातो. मेळघाट हे क्षेत्र संपूर्ण राज्यात विशिष्ट वनसंपदासोबतच कोरकू संस्कृती , व्याघ्रप्रकल्प , नैसर्गिक शेती तसेच वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनासाठी हा भूभाग प्रसिद्ध आहे. मेळघाट हा अति दुर्गम व आदिवासी भाग असल्यामुळे तुलनेत रोजगााराच्या संधी कमी आहेत. त्यामुळे येथील आदिवासी समाजाला आपल्या बाळांची काळजी, त्याला चांगला आहार देता येत नाही. त्यांनाच त्यांच्या दोन वेळच्या जेवणांची भ्रांत असतांना, त्या नवजात बाळाला, गर्भवती महिलेला तरी कुठून चांगला आहार मिळेल. मात्र केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना असून, गर्भवती महिलांची अंगणवाडी कार्यक्षेत्रात नोंद केली जाते. अशा महिलांना पोषक आहार दिला जातो. नवजात बालकांना देखील चांगला आहार देण्यासाठी योजना असतांना, हा आहार जातो कुठे असा सवाल उपस्थित होत आहे. मेळघाट हा तसा राज्यातील सर्वाधिक आदिवासी संख्य असणारा प्रदेश. तसेच सर्वांधिक वनप्रदेश याच भागात आढळून येतो. त्याचप्रमाणे सर्वाधिक कुपोषण देखील या भागात आढळून येत आहे. तब्बल 1993 पासून महाराष्ट्र सरकारने मेळघाटातील कुपोषणाच्या समस्यांसाठी लढा सुरु केला आहे. अनेक योजना आणल्या राबवल्या, अनेकवेळेस या योजनांतून भ्रष्टाचार बाहेर आला, मात्र तब्बल तीन दशकानंतर देखील मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न सुटलेला नाही. एप्रिल, मे, आणि जून या तीन महिन्यात येथील 53 बालकं दगावले आहेत. पावसाळयाच्या दिवसांत मेळघाटातील कुपोषित बालके, गर्भवती तसेच स्तनदा मातांना बालरोग आणि स्त्रीरोगतज्ज्ञांची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नजीकच्या जिल्ह्यांमधून 15 दिवसांच्या कालावधीसाठी तज्ज्ञांच्या नियुक्त्या करण्यात येतात, पण अनेक ठिकाणी हे तज्ज्ञ पोहचत नाहीत किंवा दोन-तीन दिवस हजेरी लावून निघून जातात, अशा तक्रारी आहेत. मेळघाटातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञांची कायमस्वरूपी नेमणूक करावी, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. मेळघाटात सर्वसाधारण श्रेणीत 32 हजार 576, तीव्र कुपोषित (सॅम) 409, तर मध्यम कुपोषित (मॅम) श्रेणीत 3 हजार 347 बालके आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत बालमृत्यूचा आकडा 15 ने कमी असला, तरी तीव्र कुपोषित बालकांची संख्या वाढू न देण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.मेळघाटात आजही तुलनेने उपजत मृत्यू व बालमृत्यू अधिक आहेत. बालरोगतज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञांमार्फत देण्यात येणार्या आरोग्य सेवेमुळे अर्भक मृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले आहे.
या क्षेत्रात रोजगारांच्या संधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे महिला बचतगटांच्या माध्यमातून महिलांना रोजगारांच्या संधी मोठया प्रमाणावर उपलब्ध करून देण्याची गरज आहे. शिवाय घरात पैसा आला, की व्यसन येते, त्यामुळे येथील पुरुषांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी दारुबंदीसह अनेक उपक्रम राबवावे लागणार आहे. तरच येथील घरात दोन पैसा हातात येतील, आणि ते आपल्या कुटुंबाचे योग्य पालनपोषण करू शकतील. अन्यथा कुपोषणाचे प्रकार वाढतच जातील. अंगणवाडी कार्यक्षेत्रातील सहा वर्षांपर्यंतच्या बालकांचे वजन व उंची मोजून तीव्र कुपोषित बालकांची निश्चिती करणे आणि अशा बालकांना ग्राम बालविकास केंद्रांमध्ये (व्हीसीडीसी) दाखल करणे, नियमित लसीकरण अशा उपाययोजना केल्या जातात. सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील लाभार्थी बालके, गरोदर महिला आणि स्तनदा माता यांना घरपोच आहार, अमृत आहार योजनेअंतर्गत गरोदर व स्तनदा मातांना चौरस आहार, सॅम बालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या ग्राम बालविकास केंद्रांमध्ये लाभार्थ्यांना तीन वेळचा अतिरिक्त आहार, सॅम श्रेणीतील बालकांना सामान्य श्रेणीत आणण्यासाठी औषधोपचार, अशा उपाययोजना केल्या जातात, अशी माहिती महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात आली आहे.
COMMENTS