Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

“एक-एक आमदार की किमत तुम क्या जानो…” पंकजा मुंडेंची डायलॉगबाजी!

पंकजा मुंडे यांची झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात मुलाखत

मुंबई -  भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांची झी मराठीवरील बस बाई बसया कार्यक्रमात मुलाखत पार पडली. तेव्हा त्यांना अभिनय करण्या

कायदेशीर मार्गाने आरक्षण द्यावे लागेल
केंद्र सरकारने तरी महाराष्ट्राला किती मदत करायची..? पंकजा मुंडेंचा सवाल
मा. मंत्री पंकजाताई मुंडे यांची श्री. हरिश्चंद्र महादेव यात्रा उत्सवास भेट

मुंबई –  भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांची झी मराठीवरील बस बाई बसया कार्यक्रमात मुलाखत पार पडली. तेव्हा त्यांना अभिनय करण्याची विनंती करण्यात आली. “एक चुटकी सिंदुर की किमत तुम क्या जानो रमेशबाबू” हा डायलॉग बदलून “एक-एक आमदार की किमत तुम क्या जानो सुबोधबाबू”, असा करण्यात आला. बस बाई बस कार्यक्रमाचा निवेदक सुबोध भावेकडे बघून त्यांना हा डायलॉग म्हणायचा होता. पंकजा मुंडे नी   हा डायलॉग सादर करण्याची विनंती करण्यात आली. तेव्हा त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये डायलॉग सादर केला. त्यांच्या या अभिनय कौशल्याची चर्चा होतेय. शिवाय त्यांनी आमदारांना फोडण्याविषयी, आपल्या कॉलेज जीवनाविषयी आणि लव्ह लाईफविषयी दिलखुलास उत्तरं दिली.

COMMENTS