मोहटादेवी देवस्थान येथे कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा अपघातात मृत्यू

Homeताज्या बातम्या

मोहटादेवी देवस्थान येथे कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा अपघातात मृत्यू

पाथर्डी/प्रतिनिधी : श्री क्षेत्र मोहटादेवी देवस्थानचे पुजारी विवेक उर्फ राजुदेवा भानुदास मुळे व कैलास बाबासाहेब शिंदे हे कर्मचारी मोहटादेवी गडावरून प

उत्तराखंडमधील अपघातात 7 जणांचा मृत्यू
Mangalvedha : ट्रॅक्टर – मोटारसायकलचा भीषण अपघात… एकाच जागीच मृत्यू … (Video)
शेतमजुरांना नेणारा पिकअप उलटला.

पाथर्डी/प्रतिनिधी : श्री क्षेत्र मोहटादेवी देवस्थानचे पुजारी विवेक उर्फ राजुदेवा भानुदास मुळे व कैलास बाबासाहेब शिंदे हे कर्मचारी मोहटादेवी गडावरून पाथर्डीकडे येत असताना चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.हा अपघात रविवारी पाच वाजण्याचा सुमारास हंडाळवाडी शिवारातील वृध्देश्वर तालुका सहकारी दुधसंघाजवळ झाला.
याबाबत समजलेली प्राथमिक माहिती अशी की,सदरील दोन्ही कर्मचारी आपले काम संपल्यानंतर पाथर्डीकडे येत असताना सांयकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दूधडेअरी जवळ समोरून आलेल्या चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला.हा अपघात एवढा भयंकर होता की एका कर्मचाऱ्याचे शीर धडावेगळे झाले.घटनेनंतर दोघांना पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.यावेळी देवस्थान समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, भीमराव खाडे यांच्यासह आदी कर्मचारी उपस्थित होते.या घटनेने मोठी हळहळ व्यक्ती केली जात आहे.देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी शोककळा परसली आहे.दरम्यान,घटनास्थळावरून चारचाकी वाहन चालक फरार झाला असून यावेळी काही प्रत्यक्षदर्शींनी गाडीचा नंबर घेतला असून त्या अनुषंगाने पोलीस वाहन चालकाचा शोध घेत आहेत.

COMMENTS