स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “ऊर्जा महोत्सव” कार्यक्रमाचा  शुभारंभ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “ऊर्जा महोत्सव” कार्यक्रमाचा शुभारंभ

अहमदनगर : स्वातंत्र्याच्या अमृत  महोत्सवानिमित्त  उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य "अंतर्गत आझादी का अमृत महोत्सव पॉवर@२०४७" या ऊर्जा महोत्‍सवाचे राज्‍यभर

भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयानंतर श्रीरामपुरमध्ये जल्लोष
अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघात १५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
कोपरगाव येथे शिवस्वराज्य दिन साजरा

अहमदनगर : स्वातंत्र्याच्या अमृत  महोत्सवानिमित्त  उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य “अंतर्गत आझादी का अमृत महोत्सव पॉवर@२०४७” या ऊर्जा महोत्‍सवाचे राज्‍यभर आयोजन करण्‍यात येत असून ऊर्जा महोत्सवाचा एक भाग म्‍हणून येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयात या महोत्‍सवाचा शुभारंभ प्रमुख मान्‍यवरांच्‍या हस्‍ते आज झाला. जिल्‍ह्यात 25 ते 30 जुलै दरम्‍यान जिल्‍हा प्रशासन व महावितरण तर्फे विविध कार्यकमांचे आयोजन करण्‍यात आले आहे.

या महोत्‍सवाच्‍या शुभारंभाप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार संग्राम जगताप, जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, महानगरपालिकेचे महिला व बालविकास सभापती पुष्‍पा बोरुडे महावितरणचे अधिक्षक अभियंता सुनिल काकडे, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी रेशमा होजगे, उज्‍वल भारत उज्‍वल भविष्‍य जिल्‍हा मुख्‍य समन्‍वय चालुआ राजु उपस्थित होते. कार्यक्रमात, आमदार मोनिकाताई राजळे म्‍हणाल्‍या, महावितरणतर्फे वीज ग्राहकांसाठी विविध योजना राबविल्‍या जातात. त्‍या योजनांचा लाभ सर्व वीज ग्राहकांनी घ्‍यावा. तसेच ग्रामीण भागात या योजना पोहचविण्‍यासाठी महावितरण संस्‍थेने अधिक मोठ्या प्रमाणावर प्रयत्‍न करावे. असे त्‍यांनी सांगितले. आमदार संग्राम जगताप म्‍हणाले, महावितरण संस्‍थेतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून नागरीकांना उत्‍तम सेवा देण्‍याचा त्‍यांचा प्रयत्‍न असतो. महावितरणच्‍या विविध योजनांचा नागरीकांना लाभ मिळवून देण्‍यासाठी व चांगली सेवा देण्‍यासाठी महावितरण संस्‍था अधिक प्रयत्‍न करीत असते.

जिल्‍हाधिकारी डॉ. भोसले म्‍हणाले, महावितरण संस्‍थेचे जिल्‍ह्यात मोठ्या प्रमाणात वीज ग्राहक असून गेल्‍या पाच वर्षात 30 हजार 546 शेतीपंपांना वीज पुरवठा त्‍यांनी उपलब्‍ध करून दिला आहे. महावितरण शहरी व ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी चांगली सेवा देत असून “उज्‍वल भारत, उज्‍वल भविष्‍य” अंतर्गत सर्वांना समान न्‍याय देऊन समानता मिळवून देण्‍यासाठी महावितरणने प्रयत्‍न करावेत. असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात महावितरणच्‍या विविध योजनांचा लाभ घेतलेल्‍या जिल्‍ह्यातील लाभार्थींनी आपल्‍या प्रतिक्रिया व्‍यक्‍त करतांना महावितरणला कामाबद्दल समाधान व्‍यक्‍त केले. भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयातील विद्यार्थ्‍यांनी समुहगीत सादर केले. या कार्यक्रमात केंद्र सरकारच्‍या उत्‍कृष्‍ट कामाची माहिती विविध चित्रफितीच्‍या माध्‍यमातुन दाखविण्‍यात आली. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात अधिक्षक अभियंता सुनिल काकडे यांनी जिल्‍ह्यातील झालेल्‍या विकास कामांची माहिती दिली. सुत्रसंचालन, अभियंता रवींद्र घाडगे यांनी केले तर जिल्‍हा  परिषदेच्‍या उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी रेशमा होजगे यांनी आभार व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाला महावितरणचे कार्यकारी अभियंता दिपक लहानगे, लक्ष्‍मण काकडे, राहुल गवारे, कैलास जमदाडे, विष्‍णू डवले, अतिरिक्‍त कार्यकारी अभियंता कन्‍हैय्यालाल ठाकुर, जयंत पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. 

COMMENTS