वर्धा प्रतिनिधी- वर्धा(Wardha) जिल्ह्यात खळबळजनक घटना समोर आली आहे. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी अशी ही घटना आहे. सख्ख्या भावानेच आ
वर्धा प्रतिनिधी- वर्धा(Wardha) जिल्ह्यात खळबळजनक घटना समोर आली आहे. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी अशी ही घटना आहे. सख्ख्या भावानेच आपल्या लहान बहिणीवर अत्याचार केला असून यात पीडित मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं. सख्ख्या भावाने बहिणीसोबत हैवानीकृत्य केल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. पीडित मुलगी सहा महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर या भयंकर प्रकाराचा उलगडा झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली असून पुढील तपास केला जातो आहे.
COMMENTS