पुणे : नक्षलवाद्यांनी धमकी दिल्यानंतरही एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली नव्हती असा आरोप माजी गृहराज्यमंत्री आणि शिंदे गटातील आमदार शंभ
पुणे : नक्षलवाद्यांनी धमकी दिल्यानंतरही एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली नव्हती असा आरोप माजी गृहराज्यमंत्री आणि शिंदे गटातील आमदार शंभूराजे देसाई यांनी केला होता. त्यावर एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सिक्युरिटी दिली होती अशी माहिती शरद पवार यांनी दिली. तसेच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून आपण ही माहिती घेतली असेही पवार म्हणाले.
पुण्यातील पुस्तक प्रकाशनानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी पवार म्हणाले की, आजच सकाळी माझी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट झाली. त्यानं मी विचारलं की शिंदे साहेबांना तुम्ही झेड प्लस सिक्युरिटी दिली होती का? त्यावर वळसे पाटील यांनी झेड प्लस सिक्युरिटी दिल्याचे सांगितले. मी स्वतः माजी गृहमंत्री यांच्याकडून ऐकले होते. म्हणुन या विषयावर अधिक चर्चा करणे मला योग्य वाटत नाही असे पवार म्हणाले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पवार म्हणाले की संपूर्ण सरकार केंद्रित ठेवून दोघांनी चालवायची ही भूमिका त्यांनी स्वीकारलेली दिसते आणि त्याला त्यांच्या राज्याच्या सहकार्यांची आणि केंद्रीय सहकार्यांची आणि नेतृवाची सहमती आहे. ते सत्ताधारी आहे ते जे करतील ते आपल्याला स्वीकारावं लागेल असे पवार म्हणाले. नितेश राणे यांच्या आरोपावर पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की मुलं बाळांच्या प्रतिक्रियावर मी उत्तर देणं योग्य दिसत नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. मला वस्तुस्थिती माहीत नाही पण शासनात अनेक वर्ष काम केल्यानंतर मला एक गोष्टीची माहिती आहे की, सुरक्षा कोणाला द्यायची, कोणाला नाही द्यायची याबाबत कॅबिनेट मध्ये चर्चा होत नाही. ही चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी मुख्य सचिव हे गृह सचिव, डिजी अशा वरिष्ठ अधिकार्यांची एक समिती असते आणि त्या पुढे निर्णय आणि शिफारशी केल्या जातात असेही पवार यांनी नमूद केले.
दोघांनीच सरकार चालवण्याचे ठरवलेले दिसते
मंत्रीमंडळ विस्तारासंदर्भात विचारले असता पवार म्हणाले की, दोघांनीच संपूर्ण सत्ता केंद्रीत ठेऊन सरकार चावलायचं ही भूमिका स्वीकारलेली दिसते, असे मत व्यक्त केले. तसेच पुढे बोलताना शिंदे आणि फडणवीस यांच्या या भूमिकेला केंद्र आणि राज्यातून पाठिंबा असल्याचे दिसत आहे असेही पवार म्हणाले. दोघांनीच सरकार चालवण्याला त्यांचे राज्यातील सहकारी आणि देशातील नेतृत्व या दोघांचीही संमती आहे. त्यामुळे हे सहाजिक आहे. ते सत्ताधारी आहेत. ते जे करतील ते आपल्याला स्वीकारावे लागेल, असे पवार म्हणाले.
COMMENTS