राज्यात स्वाईन फ्लूचा संसर्ग वेगाने; जणांना बाधा, सात जणांचा मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात स्वाईन फ्लूचा संसर्ग वेगाने; जणांना बाधा, सात जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांचा वेग मंदावला असला, तरी मुंबईत पावसाळी आजारांनी थैमान घातले असतांनाच, आता स्वाईन फ्लूचा धोका वाढतांना दिसून ये

४७ वर्षीय महिलेने १८ व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन
महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान
इमारतीला लागलेल्या आगीत मुलीचा होरपळून मृत्यू

मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांचा वेग मंदावला असला, तरी मुंबईत पावसाळी आजारांनी थैमान घातले असतांनाच, आता स्वाईन फ्लूचा धोका वाढतांना दिसून येत आहे. आत्तापर्यंत 142 रुग्णांना बाधा झाली आहे, तर सात जणांचा मृत्यू झाला. पावसाळा सुरू होताच स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. राज्यात 8 जूनपर्यंत 8 जणांना स्वाइन फ्लूची बाधा झाली होती, तर शून्य मृत्यूची नोंद होती. जुलैपासून सुरू झालेल्या जोरदार पावसानंतर या आजाराचा संसर्ग वाढला आहे. गेल्या दहा दिवसांत स्वाइन फ्लूचे 126 रुग्ण आढळले आहेत, तर सात जणांचा मृत्यू झाला आहे. या आजाराच्या नियंत्रणासाठी सर्वेक्षण, प्रतिबंध व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत, असे आरोग्य विभागाने सांगितले. राज्यात आत्तापर्यंत आढळलेल्या रुग्णामध्ये सर्वाधिक म्हणजे 43 रुग्ण मुंबईत आढळले आहेत. रुग्णसंख्या जास्त असली तरी मुंबईत मृतांची संख्या मात्र शून्य नोंदली आहे. त्याखालोखाल पुण्यात 23, पालघर 22, नाशिक 17, नागपूर महापालिका 14, कोल्हापूर महापालिका 14, ठाणे महापालिका 7 आणि कल्याण डोंबिवलीमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक तीन मृत्यू कोल्हापूरमध्ये झाले. पुणे आणि ठाणे महापालिकेत प्रत्येकी दोन मृत्यूंची नोंद झाली.

COMMENTS