दुर्देवी ! चिमुकल्याला वाचवताना आईचा गेला जीव.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुर्देवी ! चिमुकल्याला वाचवताना आईचा गेला जीव.

दुचाकी स्लिप होऊन भीषण अपघात

अकोला(Akola) जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना समोर येत आहेत. अशातच ट्रिप

देवदर्शनावरुन परततांना 7 भाविकांचा मृत्यू
पंढरपुरात चार तरुणांना रेल्वेने उडवले.
मेव्हण्याच्या लग्नासाठी पुण्याहून नांदेडला निघालेल्या संगणक अभियंता आशिष वैद्य यांच्या कारला अपघात 

अकोला(Akola) जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना समोर येत आहेत. अशातच ट्रिपलशीट दुचाकी स्लिप होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यु झाला. आपल्या पती अन् मुलाबरोबर दुचाकीवरून प्रवास करीत असतांना खराब रस्त्यामुळे दुचाकी स्लिप झाली. अन् चिमुकल्यासह दोघे पती पत्नी रस्त्यावर कोसळले. यादरम्यान, आपल्या 2 वर्षाच्या मुलाला वाचवताना महिलेला जीव गमवावा लागला. शारदा मुकेश बांगर(Sharda Mukesh Bangar) असं या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे आहे.

COMMENTS