आता बुस्टर डोस मिळणार मोफत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आता बुस्टर डोस मिळणार मोफत

18 ते 59 वयोगटातील नागरिकांसाठी केंद्र सरकारची घोषणा

नवी दिल्ली : देशभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी, गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांचा आकडा वाढतांना दिसून येत आहे. त्यामुळे केंद्र सरक

बिग बॉस 15मध्ये रिया चक्रवर्ती आणि अंकिता लोखंडे भिडणार एकमेकींना l पहा LokNews24 —————
नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या सायकल ट्रॅकच्या कामावरून  पेटला वाद 
कोपरगाव शहराच्या विविध प्रभागात विकासाची घौडदौड सुरूच

नवी दिल्ली : देशभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी, गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांचा आकडा वाढतांना दिसून येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लसीकरणाची मोठी मोहीम हाती घेतली आहे. येत्या 15 जुलैपासून 75 दिवस कोरोना लसीकरणाची मोहीम राबवली जाईल. देशातील 18 वर्षांवरील नागरिकांना मोफत बुस्टर डोस दिला जाणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातील 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना ही सुविधा सरकारी लसीकरण केंद्रावर मिळणार आहे. 15 जुलैपासून विशेष मोहिमेअंतर्गत बुस्टर डोस मोफत दिला जाणार आहे. ही मोहीम 75 दिवस चालणार आहे. या अंतर्गत ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना सरकारी लसीकरण केंद्रावर मोफत बुस्टर डोस देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाच्या बुस्टर डोससंबंधीचा निर्णय घेण्यात आला. याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. ते म्हणाले, ‘मार्च 2022 पासून कोरोना महामारी हा देशासमोरचा मोठा चिंतेचा विषय आहे. भारताने आतापर्यंत 199 कोटींपेक्षा जास्त कोरोना लसीकरण केले आहे. हा आकडा जवळपास 199 कोटी 60 हजार आतापर्यंत लसीकरण झाले आहे. आता 15 जुलै 2022 पासून पुढील 75 दिवसांपर्यंत 18पेक्षा जास्त वयच्या नागरिकांना बूस्टर डोस मोफत मिळेल. यामुळे नागरिकांना सुरक्षा मिळेल. आधी बूस्टर डोससाठी नागरिकांकडून शुल्क घेतले जात होते. यापूर्वी फ्रंटलाइन वर्कर्स, कोव्हिड वॉरिअर्स होते. किंवा 60 वर्षांपुढील नागरिकांसाठी हा बुस्टर डोस मोफत दिला जात होता. आता 18 वर्षांपुढील नागरिकांना हा मोफत दिला जाईल. सर्व सरकारी केंद्रांवर हा डोस उपलब्ध असेल, अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली. आयसीएमआर आणि इतर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रांच्या संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार, बुस्टर डोसद्वारे नागरिकांची कोरोना विरोधात लढण्याची क्षमता आणखी वाढेल. सुरुवातीला कोरोना लसीकरणाचे दोन डोस घेतल्यानंतर सहा महिन्यात अँटीबॉडीजचे प्रमाण कमी होऊ लागते. बूस्टर डोस घेतल्याने प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे देशातील 18 वर्षांपुढील नागरिकांसाठी मोफत बुस्टर देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारतर्फे घेण्यात आला आहे.

COMMENTS