Homeताज्या बातम्या

अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले ‘एकनाथ’ .

अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले 'एकनाथ'

मिरज पंढरपूर (Miraj Pandharpur) राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी(Kerewadi) फाट्याजवळ आज एक भीषण अपघात घडला. आषाढी वारी ( Ashadhi Wari) साठी पंढरप

गुजरातमधील अरवली जिल्ह्यात भीषण अपघात
मद्यधुंद चालकाचे ट्रक वरचे नियंत्रण सुटल्याने ट्रकचा आपघात 
गुजरातमध्ये अपघातात 9 जणांचा मृत्यू

मिरज पंढरपूर (Miraj Pandharpur) राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी(Kerewadi) फाट्याजवळ आज एक भीषण अपघात घडला. आषाढी वारी ( Ashadhi Wari) साठी पंढरपूरकडे(Pandharpur) निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पीक अप जीप घुसून झालेल्या या अपघातात 14 वारकरी जखमी झाले . जखमींना तातडीने मिरज सिव्हिल(Miraj Civil) आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात(Kavthemahankal Rural Hospital) पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी स्वतः मिरजेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे(Dr. Rupesh Shinde) यांना फोन लावून या वारकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली . त्यासोबत त्यांना लागतील ते सर्व उपचार करावेत . वेळ पडल्यास त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करावे त्यांच्यावरील उपचारात कोणतीही कसूर ठेवू नका असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) दिले . त्यासाठी लागेल तो खर्च उचलण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली .

eknath shinde

COMMENTS