गटविकास अधिकार्‍यांवर कारवाई करून बदली करावी ; लाभार्थ्यांचा उपोषणाचा इशारा

Homeताज्या बातम्या

गटविकास अधिकार्‍यांवर कारवाई करून बदली करावी ; लाभार्थ्यांचा उपोषणाचा इशारा

अहमदनगर/प्रतिनिधी : पाथर्डी तालुक्यातील पशु वैद्यकीय अधिकारी 15 वर्षांपासून एकाच जागेवर आहेत. त्यांच्याकडे गट विकास अधिकारी म्हणूनही चार्ज आह

Buldhana : राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचा संप चिघळला (Video)
BREAKING: तहसीलदार अर्चना पागिरे यांचा अपघात की हत्येचा प्रयत्न…???? पहा Lok News24
आमदार अपात्रतेची सुनावणी अंतिम टप्प्यात

अहमदनगर/प्रतिनिधी : पाथर्डी तालुक्यातील पशु वैद्यकीय अधिकारी 15 वर्षांपासून एकाच जागेवर आहेत. त्यांच्याकडे गट विकास अधिकारी म्हणूनही चार्ज आहे. ते तालुक्यातीलच असून राजकीय लोकांच्या संपर्कात आहेत. त्यांच्या सांगण्यावरून ते लोकांना त्रास देतात. लाभार्थ्यांची पिळवणूक करुन त्यांच्याकडे पैशांची मागणी करतात. त्यांच्यावर कारवाई करावी व त्यांची बदली करावी, अशी मागणी पाथर्डी येेथील लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

निवेदनात म्हटले की, आम्ही सर्व पाथर्डी तालुक्यातील लाभार्थी आहोत. सन 2021 ते 2022 पासून रोजगार हमी योजनेमधील विविध योजना विहीर, शौचालय, घरकूल, फळबाग व गायी-गोठा योजनेतील पैसे न देऊन लाभार्थीची पिळवणूक करून लाभार्थींना हेलपाटे मारावे लागत आहेत. पैशाची मागणी करणे व लोकांना हीन वागणूक देऊन व अपशब्द वापरून अपमानीत केले जाते. गटविकास अधिकारी हे तालुक्यातील असून ते राजकीय लोकांच्या संपर्कात आहेत. त्यांच्या सांगण्यावरून लोकांना त्रास देतात. ते सुमारे 15 वर्षापासून पशु वैद्यकीय अधिकारी म्हणून एकाच ठिकाणी पाथर्डीत आहेत. त्यांची बदली का होत नाही? गट विकास अधिकारी म्हणून चार्ज त्यांच्याकडे आहे. ते विविध योजनेतील लोकांना वेळोवेळी पैशाची मागणी करून त्रास देत आहेत. त्यामुळे त्यांची बदली होऊन आम्हाला गटविकास अधिकारी तालुक्याच्या बाहेरचे मिळावे, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. सर्व चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करावी व बदली करावी. जर त्यांची बदली झाली नाही, तर आम्ही सर्व लाभार्थी 11 जुलै 2022 रोजी जिल्हा परिषद अहमदनगर येथे सकाळी 11 वाजता उपोषण सुरु करणार आहोत व याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी कृष्णा फुंदे, जालिंदर साप्ते, मारुती बांगर, विकास गोरे, रामनाथ खेडकर, दत्तात्रय केदार, गणेश म्हस्के, अनिल दहिफळे, नितीन मासाळ, अनिल जाधव, प्रवीण जाधव, राजू राठोड आदींसह लाभार्थी उपस्थित होते.

COMMENTS