माळीवाडा बस स्थानकातून दोन वृद्ध महिला बेपत्ता

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माळीवाडा बस स्थानकातून दोन वृद्ध महिला बेपत्ता

अहमदनगर/प्रतिनिधी : कर्जत येथून केडगाव येथे आजारी जावयास भेटण्यासाठी आलेल्या सासू व आजे सासू कर्जतला माघारी जाताना माळीवाडा बस स्थानकातून बेपत्ता झाल

सीरम पाठोपाठ भारत बायोटेककडूनही कोरोना लसीच्या किमती जाहीर | ‘१२ च्या १२ बातम्या’ | Lok News24
कांदा आणतोय…आतापासूनच डोळ्यांत पाणी…
बेलापूरच्या शनैश्‍वर यात्रेतील कुस्ती हगाम्याची सुरूवात

अहमदनगर/प्रतिनिधी : कर्जत येथून केडगाव येथे आजारी जावयास भेटण्यासाठी आलेल्या सासू व आजे सासू कर्जतला माघारी जाताना माळीवाडा बस स्थानकातून बेपत्ता झाल्या आहेत. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात त्या दोघी बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती अशी की, दि. 27 रोजी सासू मालती कर्णिक जगधने व आजे सासू द्रोपदी जानु जगधने (रा.कौडाणे, ता. कर्जत, जि.अ.नगर) येथून जावई आजारी असल्याने त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी आल्या होत्या. त्यानंतर दिनांक 30 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कर्जतच्या घरी जाण्यासाठी त्यांना स्वप्निल गायकवाड यांनी माळीवाडा बसस्टँड आऊट गेटवर सोडले. दुपारी सासू व आजे सासू यांना त्यांच्या मोबाईलवर फोन लावला असता तो बंद लागल्याने त्यावर संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांचा बसस्टँड परिसरात, नगर शहरात व नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला परंतु त्या मिळून आल्या नाही. त्यामुळे याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात स्वप्निल नानाभाऊ गायकवाड (वय 23 वर्ष, रा. मोहिनीनगर, केडगाव) यांनी दिलेला माहितीवरून हरवल्याची नोंद घेतली असून अधिक तपास कोतवाली पोलिस करीत आहे.

कोणाला माहिती असल्यास कळवावे
नगरच्या बसस्थानकावरून बेपत्ता झालेल्या दोन्ही महिलांबाबत कोणाला काही माहिती असल्यास कोतवाली पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या महिलांचे वर्णन असे ः मालती कर्णिक जगधने, वय 35 वर्षे, रंग गोरा, चेहर उभट, डोळे काळे, नाक सरळ उंची 5 फुट 2 इंच, अंगात लाल रंगाची साडी त्यावर काळ्या रंगाची डिझाईन असलेली पायात चप्पल. तर आजे सासू द्रोपदी जानु जगधने,वय 70 वर्षे, रंग सावळा, चेहरा गोल, डोळे काळे, नाक सरळ, केस काळे पांढरे, उंची 5 फुट 1 इंच, उजव्या हातावर गोंदलेले, अंगात नारंगी रंगाची कॉटनची साडी, पायात चप्पल असे वर्णन आहे.

COMMENTS