डीलरशीप देण्याच्या आमीषाने केली…13 लाखाची फसवणूक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डीलरशीप देण्याच्या आमीषाने केली…13 लाखाची फसवणूक

अहमदनगर/प्रतिनिधी : ‘वन प्लस’ कंपनीची डीलरशीप देण्याच्या नावाखाली एका व्यावसायिकाची 13 लाख 25 हजाराची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी व्याप

अरविंद मालखेडे मध्य रेल्वेचे नवे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक
शाहू महाराजांची सामाजिक समतेची शिकवण ही काळाची गरज
32 कोटींचा तो विषय ठेवला राखून, स्मशानभूमीचा नवा प्रस्ताव आणणार

अहमदनगर/प्रतिनिधी : ‘वन प्लस’ कंपनीची डीलरशीप देण्याच्या नावाखाली एका व्यावसायिकाची 13 लाख 25 हजाराची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी व्यापारी प्रणव प्रफुल्ल बांठीया (वय 25, रा. भवानीनगर, बुरूडगाव रस्ता, अहमदनगर) यांनी सायबर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात मोबाईल नंबर धारक व्यक्तीविरुध्द भादंवि कलम 420, 467, सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (डि) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25 एप्रिल 2022 ते 17 जून 2022 दरम्यान ही फसवणुकीची घटना घडली आहे. बांठीया हे अहमदनगर शहरातील व्यावसायिक असून त्यांच्या मोबाईलवर सोशल मीडियावरील अ‍ॅपमध्ये एक लिंक आली होती. ‘वन प्लस’ कंपनीची डीलरशीप देण्याचे त्यामध्ये नमूद होते. बांठीया यांनी ही लिंक ओपन करून त्यामध्ये वैयक्तीक माहिती नमूद केली. त्यानंतर बांठीया यांना एका नंबरवरून फोन आला. ‘वन प्लस’ कंपनीमधून बोलतो असे सांगत डीलरशीप देतो असेही सांगितले. तसे त्याने व्हॉट्सअ‍ॅप व मेल आयडीवरून खोटी कागदपत्रे पाठवून बांठीया यांचा विश्‍वास संपादन केला व डीलरशीप देण्यासाठी 13 लाख 25 हजार रुपये घेत बांठीया यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ’वन प्लस’ कंपनीची डीलरशीप देण्याच्या जाहिरातीवर विश्‍वास ठेवून बांठीया यांनी ती लिंक ओपन करून त्यामध्ये वैयक्तीक माहिती भरली होती. अज्ञात व्यक्तीने त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना बनावट कागदपत्रे पाठवली व त्यांच्याकडून पैसे घेऊन डीलरशीप न देता बाठीया यांची फसवणूक केली. या प्रकरणी अधिक तपास सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले करीत आहेत.

COMMENTS