उपराष्ट्रपतीपदाची 6 ऑगस्टला निवडणूक

Homeताज्या बातम्या

उपराष्ट्रपतीपदाची 6 ऑगस्टला निवडणूक

नवी दिल्ली : राष्ट्रपती पाठोपाठ उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 6 ऑगस्टला होणार आहे. निवडणूक आयोगाने ही

अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण थांबवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा यांचे आवाहन
दोन दिवसात संपणार पुण्यातील लसींचा साठा
किनवटच्या जंगलात वन विकास महामंडळाचा ’रक्तपात’; आदिवासींच्या हक्कावर कुर्‍हाड!आ. भीमराव केराम आक्रमक; राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडून महाराष्ट्र शासनाला ’नोटीस’

नवी दिल्ली : राष्ट्रपती पाठोपाठ उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 6 ऑगस्टला होणार आहे. निवडणूक आयोगाने ही घोषणा केली. विद्यमान उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ संपत असल्याने या निवडणुकीची अधिसूचना 5 जुलै रोजी काढली जाणार असून 19 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 20 जुलै रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून, 22 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 6 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे.लोकसभा व राज्यसभेचे सदस्य उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेतात. या निवडणुकीत नामनिर्देशित सदस्यही सहभागी होतात. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला.

COMMENTS