‘इलेक्ट्रीक पब्लिक ट्रान्सपोर्ट’ देशाला परवडणारे : नितीन गडकरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘इलेक्ट्रीक पब्लिक ट्रान्सपोर्ट’ देशाला परवडणारे : नितीन गडकरी

क्रूड ऑईलची 7 लाख कोटींची आयात लक्षात घेता आणि रस्त्यांच्या माध्यमातून होणारी 85 टक्के वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांना परवडणारी आणि

…अन्यथा गरज पडली तर तुमचं धोतर फेडू | LOKNews24
जन्मदात्याकडून पोटच्या मुलीवर शस्त्राने वार
जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद ; नागरिकांनी बाहेर पडण्याचे टाळले

नागपूर : क्रूड ऑईलची 7 लाख कोटींची आयात लक्षात घेता आणि रस्त्यांच्या माध्यमातून होणारी 85 टक्के वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांना परवडणारी आणि स्वदेशी इलेक्ट्रिकवरील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देशाला परवडणारी असून त्यासाठी आपले प्रयत्न सुरु असल्याचे केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

सीआायआयच्या राष्ट्रीय परिषदेत रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यास निर्माण झालेली मागणी, या विषयावर ते बोलत होते. या प्रसंगी गडकरी म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर होणारी वाहतूक ही चिंतेची बाब असून यावर नियंत्रणासाठी इलेक्ट्रिकवर चालणारी सर्वसामान्यांना परवडणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी निर्माण करता येईल यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. पेट्रोल-डिझेलचा वाढता वापर लक्षात घेता पर्याय म्हणून जैविक इंधन, इलेक्ट्रिकवरील वाहने, सीएनजी, बायो सीएनजीवर चालणार्‍या वाहनांचा वापर आगामी काळात अनिवार्य ठरणार आहे. ऑटोमोबाईल क्षेत्राची वर्तमान उलाढाल 7 लाख कोटींपेक्षा अधिक आहे. हे क्षेत्र अधिक रोजगार देणारे क्षेत्र असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- या क्षेत्रानेही आता पारंपरिक इंधनाला पर्याय म्हणून ई व्हेईकलची निर्मिती सुरु केली आहे. देशाने प्रथम जलमार्ग, नंतर रेल्वेमार्ग, रस्ते आणि शेवटी आकाश मार्गांचा वापर केला पाहिजे. मुंबई-दिल्ली महामार्ग हा ई महामार्ग बनविण्याचे आपले प्रयत्न आहेत. तसेच महामार्ग बांधकाम करताना रस्त्यांच्या शेजारी असलेल्या जागांचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या जागांवर विविध उद्योगांचे समूह, लॉजिस्टिक पार्क, स्मार्ट व्हिलेज, रेस्टारंट आदींसारखा विकास केला तर रोजगार निर्मिती होईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

COMMENTS