श्रीरामपूरच्या काँग्रेस शहराध्यक्षाने उद्धव ठाकरेंचा बॅनर झळकावला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीरामपूरच्या काँग्रेस शहराध्यक्षाने उद्धव ठाकरेंचा बॅनर झळकावला

गद्दारांना क्षमा न करण्याचे केले आवाहन

अहमदनगर/प्रतिनिधी : ’साहेब, गद्दारांना क्षमा नाही, आय सपोर्ट उद्धव ठाकरे’ अशा आशयाचे बॅनर राज्यभरात शिवसैनिकांनी मागील दोन-तीन दिवसात लावले आहे. पण न

कालिचरण महाराजांना उमेदवारी दिली तर…
दुष्काळ सदृश्य परिस्तिथीमुळे आ.आजबेंचा वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा
Ahmednagar : अरणगाव येथे विवाहित महिलेची आत्महत्या… पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर/प्रतिनिधी : ’साहेब, गद्दारांना क्षमा नाही, आय सपोर्ट उद्धव ठाकरे’ अशा आशयाचे बॅनर राज्यभरात शिवसैनिकांनी मागील दोन-तीन दिवसात लावले आहे. पण नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय छल्लारे यांनी अशाच आशयाचा बॅनर श्रीरामपूर नगरपालिकेजवळ झळकावला असून, शिवसेनेतील ठाकरे-शिंदे वादात काँग्रेसच्या पदाधिकार्‍याने ठाकरेंना दिलेला सपोर्ट चर्चेचा झाला आहे.
शिवसेनेत पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यात वादंग सुरू असून, त्यामुळे शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपने पूर्ण मौन पाळले असून, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या राज्यस्तरीय मान्यवर नेत्यांकडून यावर मोजकेच भाष्य करताना त्यांच्याकडून महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे राज्यभरातील शिवसेनेत दोन गट पडले असून, दोन्हींकडून बॅनरबाजी व एकमेकांच्या कार्यालयांवरील हल्ले जोरात सुरू आहेत. अशा पार्श्‍वभूमीवर श्रीरामपूर शहराचे काँग्रेस अध्यक्ष संजय छल्लारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बॅनर झळकावल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे. मी महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षाचा सदस्य आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आमच्या (काँग्रेस) नेत्या सोनिया गांधींनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मी ठाकरेंच्या समर्थनार्थ बॅनर लावला, यात वावगे काही नाही, अशी प्रतिक्रिया छल्लारे यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील वा राज्यातील अन्य काँग्रेस नेत्यांनी असे फलक लावावे की नाही, ही त्यांची मानसिकता आहे, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

अडीच वर्षे सत्तेत होते ना?
शिवसेनेतून बाहेर पडलेले आज दोन्ही काँग्रेसला दोष देत असले तरी अडीच वर्षांपूर्वी ही सत्ता येत असताना त्याचवेळी त्यांनी ही भूमिका का नाही मांडली? की, आता इडी मागे लागल्यावर त्यांना याचा साक्षात्कार झाला, असा सवाल करून छल्लारे म्हणाले, उद्धव ठाकरे हे सरळमार्गी नेते आहेत. आमच्या नगर जिल्ह्याचे काँग्रेसचे दोन नेते-आमदार त्यांच्या सरकारमध्ये आजही आहेत. त्यामुळे आम्हीही घटकपक्ष म्हणून सरकारमध्ये आहोत. म्हणून ठाकरे यांच्या समर्थनार्थ फलक लावला, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यभरात चर्चा सुरू
श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक व काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष संजय छल्लारे यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ श्रीरामपूर नगरपरिषद कार्यालयाजवळ बॅनर लावले आहे. या बॅनरवर ’साहेब गद्दारांना क्षमा नाही, आय सपोर्ट उद्धव ठाकरे’ आशा आशयाचा मजकूर असून, भगव्या रंगाच्या या बॅनरवर शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, काँग्रेसचे श्रीरामपूरचे माजी आमदार दिवंगत जयंत ससाणे तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह छल्लारे यांनी स्वतःच्या गळ्यात भगवे उपरणे घातलेला फोटो लावण्यात आला आहे.

COMMENTS