राज्यात ५२७ टँकर्सने पाणीपुरवठा

Homeताज्या बातम्या

राज्यात ५२७ टँकर्सने पाणीपुरवठा

मुंबई : राज्यात २० जूननुसार ६३४ गावे आणि १३९६ वाड्यांना ५२७ टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये शासकीय टँकर्सची संख्या ८८ तर खाजगी टँकर

डबल इंजिनचे सरकार सत्तेत आल्यावर आमच्या सरकारने ठराव तयार केला व केंद्राला पाठवला- सहकार मंत्री अतुल सावे 
माहूर शहरातील शासकीय निवासी शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
पालिकेच्या अग्नीशमन केंद्रावर गाड्या धुण्याचे सेंटर सुरू : विक्रमभाऊ पाटील

मुंबई : राज्यात २० जूननुसार ६३४ गावे आणि १३९६ वाड्यांना ५२७ टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये शासकीय टँकर्सची संख्या ८८ तर खाजगी टँकर्सची संख्या ४३९ इतकी आहे. मागील आठवड्यात टँकर्सची संख्या ५०१ इतकी होती. पावसाला सुरुवात झालेली असल्यामुळे एक-दोन दिवसात टँकर्स कमी होतील अशी आशा आहे. राज्यातील धरणातील एकूण पाणीसाठा २० जूननुसार २२.३२ टक्के इतका आहे. विभागवार पाणीसाठ्यामध्ये अमरावती विभागातील प्रकल्पात ३२.८१ टक्के, मराठवाडा विभागात २६.८ टक्के, कोकण विभागात ३५.१२ टक्के, नागपूर विभागात २७.३९ टक्के, नाशिक विभागात २१.२१ टक्के, पुणे विभागात १३.२८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. अधिग्रहित केलेल्या विहिरी आणि विंधन विहिरींची संख्या २२६७ इतकी आहे.

COMMENTS