शिक्षकांच्या बदलीसाठी होणार सोमवारपासून प्रोफाईल अपडेट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षकांच्या बदलीसाठी होणार सोमवारपासून प्रोफाईल अपडेट

ग्रामविकास विभागाचे आदेश, जिल्ह्यातील शिक्षकांना संधी

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यासाठी सोमवारपासून (दि.13) बदलीसाठी पात्र शिक्षकांचे प्रोफाईल अपडेट करता येणार आहे. यासाठी

धनुष्यबाण चिन्हावर आगामी सर्व निवडणुका लढवणार ः खा.सदाशिव लोखंडे
प्रवरेच्या कृषीदुतांचे पिंपळवाडीत स्वागत
गौराईच्या स्थापनेत साकारला चंद्रयान-3 चा देखावा

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यासाठी सोमवारपासून (दि.13) बदलीसाठी पात्र शिक्षकांचे प्रोफाईल अपडेट करता येणार आहे. यासाठी सात दिवसांचा कालवधी असून 20 जूनपर्यंत शिक्षकांना स्वत:ची माहिती स्वत:च्या मोबाईलवरून बदलीसाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर टाकता येणार आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसाठी शिक्षण विभागाने बदलीपात्र शिक्षकांची सर्व माहिती यापूर्वीच ग्रामविकास विभागाला सादर केलेली आहे. त्यानंतर राज्य पातळीवरून शिक्षकांच्या बदलीसाठी नवीन प्रणाली विकसित करण्यात आलेली असून मागील 15 दिवसांपूर्वी त्याची रंगीत तालीमही घेण्यात आलेली आहे. गुरुवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीम यांच्या उपस्थितीत ऑनलाईन प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला आहे.
यंदा बदली पात्र शिक्षकांसाठी अवघड क्षेत्रातील शाळा फायनल झालेल्या नाहीत. यामुळे मागील वर्षी अवघड क्षेत्रात असणार्‍या शाळांच्या यादीच्या आधारे शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. जिल्हांतर्गत बदली करताना ज्या शिक्षकांचे सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे सेवा पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत पाच वर्षे पूर्ण झालेली आहेत, अशा शिक्षकांसाठी तरतूद करण्यात आलेली आहे. बदली पात्र शिक्षकांना 30 शाळांचा पसंती क्रमांक द्यावा लागणार आहे. यंदा सहा टप्प्यात शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत.
यानुसार शिक्षकांना स्वत:च्या प्रोफाईल अपडेट करण्यासाठी सोमवार (दि.13) पासून मुदत देण्यात आली असून ही मुदत 20 तारखेपर्यंत राहणार आहे. यात संंबंधित शिक्षकांना स्वत:चे नाव, व्यक्तिगत माहिती बरोबर आहे की नाही याची दुरुस्ती करता येणार आहे. तसेच आधार क्रमांक, पॅनकार्ड, जन्म तारीख, विद्यमान नियुक्तीचे ठिकाण आणि सेवाविषय माहिती अपडेट करता येणार आहे. स्वत:च्या रजिस्टर्ड मोबाईलवरून ओटीपीच्या सहाय्याने ही माहिती अपडेट करता येणार आहे. दुरुस्ती केलेल्या माहितीला गटशिक्षणाधिकारी यांच्या स्तरावर माहिती तपासून त्याला मान्यता देण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

त्यांना स्वतंत्र अर्ज करावे लागणार
तसेच पक्षाघाताने आजारी शिक्षक, दिव्यांग शिक्षक, शस्त्रक्रिया झालेले शिक्षक, विधवा शिक्षीका, कुमारिका शिक्षक, परित्याक्त्या शिक्षक, घटस्फोटीत महिला शिक्षक त्याच प्रमाणे व्याधीग्रस्त शिक्षकांसोबतच पती-पत्नी एकत्रिकरण आदी विशेष संवर्गातील शिक्षकांना बदली हवी असल्यास किंवा नको असल्यास अर्ज करावा लागणार आहे.

स्वतंत्र प्रणाली विकसित
यंदा शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या होणार आहेत. यापूर्वी देखील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन होत होत्या. मात्र, यंदा ग्रामविकास विभागाने नव्याने ऑनलाईन प्रणाली विकसित केली असून त्यानुसारच शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. यामुळे बदलीच्या प्रक्रियेत पारदर्शता येणार असली तरी बदल्यासाठी प्रत्यक्षात जुलै महिना उजाडणार असल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

COMMENTS