Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जीप पलटी झाल्याने जेजुरीहून धुळदेवकडे निघालेल्या नवरदेवाचा अपघाती मृत्यू

लोणंद / वार्ताहर : लोणंद-फलटण रस्त्यावर काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काळज (ता. फलटण) जवळ जीप पलटी होऊन झालेल्या अपघातात नुकतेच लग्न झालेल्या

कोट्यवधींच्या शेअर मार्केट घोटाळ्याचा भांडाफोड लवकरच होणार
पोपट कुंभार बंधुता काव्यप्रतिभा पुरस्काराने सन्मनीत
शिराळा येथे चारचाकी व मोटरसायकल अपघात; एक जखमी तर एक मयत

लोणंद / वार्ताहर : लोणंद-फलटण रस्त्यावर काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काळज (ता. फलटण) जवळ जीप पलटी होऊन झालेल्या अपघातात नुकतेच लग्न झालेल्या आणि जेजुरीहून धुळदेवकडे (ता. फलटण) निघालेल्या नवरदेवाचा मृत्यू झाला. तसेच या जीपमध्ये असलेले अन्य काहीजण जखमी झाले आहेत.
याबाबत लोणंद पोलिसांकडून (ङेपरपव झेश्रळलश) मिळालेली माहिती अशी, बार्शी (जि. सोलापूर) येथील नुकतेच लग्न झालेले नवरदेव सुखदेव रवींद्र वाघमोडे (वय 26) हे आपल्या लग्नानंतर देवदर्शनासाठी जीपगाडीतून नातेवाईकांसमवेत जेजुरी येथून लोणंद-फलटण रस्त्यावरून फलटण तालुक्यातील धुळदेव या ठिकाणी देवदर्शनासाठी निघाले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काळजजवळ आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी पलटी होऊन हा अपघात झाला. त्यामध्ये नवरदेव सुखदेव हा गंभीर जखमी झाला. त्यास तातडीने फलटण येथे खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारापूर्वीच तो मृत्यू पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, जीप गाडीतील अन्य काहीजण जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद लोणंद पोलिस ठाण्यात रात्री उशिरा करण्यात आली. दरम्यान, सध्या लोणंद-फलटण रस्त्याच्या सहापदरीकरणाची काम सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी कामे करताना संबंधित यंत्रणेने पुरेशी खबरदारी घेतली नसल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे या मार्गावर अपघातांच्या घटना घडत आहेत.

COMMENTS