काय चघळणार पुरोगामीत्व ?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

काय चघळणार पुरोगामीत्व ?

भारतीय संसदीय लोकशाहीत राजसत्तेवर जाण्यासाठी शैक्षणिक पात्रता वजा करण्यात आली आहे. त्याचे मूळ कारण आपल्या शिक्षण व्यवस्थेत आहे. आजची आपली शिक्षण व्यव

कारागृहातील प्रशासनाला हादरे
क्रूर दहशतीचा खात्मा
नाचरे मोरा…

भारतीय संसदीय लोकशाहीत राजसत्तेवर जाण्यासाठी शैक्षणिक पात्रता वजा करण्यात आली आहे. त्याचे मूळ कारण आपल्या शिक्षण व्यवस्थेत आहे. आजची आपली शिक्षण व्यवस्था नापास आहे हे खरे असले तरी आपल्या देशाचा इतिहास तपासला तर इथे शिक्षणाची दारे सर्वांसाठी बंद केलेली होती. हजारो वर्ष मनुस्मृतीच्या आधारे राज्य करणाऱ्या ब्राम्हणांनी या देशात विषमतावादाची संस्कृती निर्माण करून ब्राम्हणोत्तर लोकांवर अन्याय, अत्याचार आणि सर्व तऱ्हेचे शोषण केले. महात्मा जोतीराव फुले यांनी ही मनुची बेडी तोडून सर्वांना शिक्षण खुले केले.

संविधानातील कायद्याने सर्वांसाठी शिक्षणसक्ती केली. पण, धोरणकर्त्यानी शिक्षण व्यवस्थेत पुन्हा विषमता निर्माण करून वंचित घटकाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे कटकारस्थान केलेले आहे. आज राजकारणात उमेदवारांना शैक्षणिक पात्रता का नाही? या मोठ्या प्रश्नापेक्षा राजकारणात असणारे सर्व गुंडगिरी पार्श्वभूमी असणारे आहेत यावर कुणी बोलणार आहे का? हल्ली अंगठेबहाद्दर उमेदवार आमदार, खासदार होतात. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार निवडून येण्यासाठी आपल्याकडे निवडणुकीत लॉटरीच लागणार असते आणि ती लागतेच. आपण आपला देश चालवायला एखाद्याच्या हातात देणार असू, तर ते हात सक्षम असायलाच हवेत. ज्या कुणा उमेदवाराला आपण मत देऊ इच्छिता त्यांची पात्रता, शिक्षण, त्यांनी समाजासाठी केलेली कामे यांचा आढावा नागरिकांनी घेतला पाहिजे. पण तसे होत नाही. त्याचे कारण असे की, आपले लोक संसदीय लोकशाहीत जगत असले तरी त्यांच्या डोक्यातील गुलामीची हवा आजही निघालेली नाही. किंबहुना मनुस्मृतीने लादलेल्या बंधनातून ते स्वतंत्र झालेले नाहीत. त्यामुळे संविधानाने व्यक्तीला जरी स्वातंत्र्य दिले असले तरी तिला त्या स्वातंत्र्याचा उपभोग लोकांना घेता येत नाही. भारतीय नागरिकांना गुलाम ठेवण्यासाठी आपल्या देशात एक व्यवस्था काम करते. सांस्कृतिक लढ्याच्या नावाखाली काम करणाऱ्या या व्यवस्थेचे अपवाद वगळता सर्व राजकीय पक्ष गुलाम आहेत. त्याला अलीकडे आणि पलीकडेही कुणीच अपवाद नाही. म्हणजे, राज ठाकरेंच्या भोंग्याला जेव्हा पुरंदरेचा संदर्भ दिला जातो, तेव्हा पवारांचं पुरोगामीत्व खदखदून जाग होत. आणि हेच पवार दुसरीकडे भिडे गुरुजीला पोसून मोठे करतात. गम्मत अशी आहे, अमोल मिटकरीला आणि छगन भुजबळाला जी भूमिका दिली आहे ती फक्त त्या ब्राम्हण विरोधी शिंतोडे उडवण्यासाठीच. पण, या शिंतोड्यानें नाराज झालेल्या ब्राम्हणांना खुश करण्यासाठी पवार पुण्यात बैठकीचा अभिषेख घालतात. भुजबळ यांनी पुरोहित हे धंदा करतात (व्यवसाय नाही) हा शब्द वापरून त्यांची टिंगल केली. पण भुजबळांसह त्यांचे सर्व कार्यकर्ते यांचे ब्राह्मणाशिवाय पानही हालत नाही. आता पुण्यात पवारांच्या ब्राह्मणांच्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी कार्यक्रम घेऊन मनसेच्या अयोध्या दौऱ्याबाबत मुद्दाम वातावरण तापवले गेले असल्याचे सांगितले. एरव्ही मराठी माणूस, मराठी पाट्या, मराठी भाषा हे सगळं सुरु असतांना अयोध्येचा पुळका कशाला? इथे तुळजा भवानी, आंबाबाई, काळूबाई, येडूबाई असे शेकडो हिंदू देवतेचे पवित्र स्थळे आहेत. अयोध्येचे कारण एवढेच की, भोंग्याची पिपाणी झाल्यानंतर अयोध्येसारखा प्रभावी मुद्दाच नव्हता. आता अयोध्या दौरा गुंडाळल्यानंतर त्याचा सर्व दोष शिवसेनेवर ढकलला. ही राज यांनी त्यांच्या पक्षासाठी घेतलेली भूमिका बरोबरच. कारण, या सर्वांच्या राजकारणाचा पाया हा धर्म आहे. धर्मवेडे लोक आहेत म्हणून देवाधर्माच्या नावाने इथे सर्वांचे राजकारण पूर्णत्वास जात आहे. पण राजकारणातून जो धर्म मजबूत केला जात आहे तो सर्व राजकारण्यांना कायमस्वरूपी गुलामीकडे घेऊन जाणार आहे. तेव्हा धर्माचे ठेकेदार हे कोण असणार आहेत? तेव्हा, पुरोगामीत्व चघळायला लोकशाहीच नसेल तर काय चघळणार पुरोगामीत्व? 

COMMENTS