आ. संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला.एसटी बस आणि आमदार जगताप यांच्या बीएमडब्ल्

तालुक्यातील माणिकदौंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी नियमित डॉक्टर उपलब्ध असावे ; काँग्रेसची मागणी
मुळा-प्रवरा संचालक मंडळाला उच्च न्यायालयाची नोटीस
पोलिस भरतीचा पेपर फुटल्याची अफवा पसरविणार्‍यावर गुन्हा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला.
एसटी बस आणि आमदार जगताप यांच्या बीएमडब्ल्यू गाडीमध्ये हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात जगताप यांना कुठलीही दुखापत झाली नाही. या अपघातातून ते थोडक्यात बचावले आहेत. तसेच या अपघातात अन्य कोणीही जखमी झालेले नाही. मात्र जगताप यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास रसायनीजवळ हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कामासाठी जगताप कार्यकर्त्यांसह रात्रीच मुंबईला रवाना झाले होते. त्यांचे काही कार्यकर्ते पुढे गेले होते. जगताप त्यांच्या बीएमडब्ल्यू एक्स ५ या गाडीतून निघाले होते. गाडीत ते आणि चालक दोघेच होते. रात्रीची वेळ असल्याने जगताप झोपेत होते. मुंबईच्या जवळ गेल्यावर रस्त्याचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी लेन खोदून रस्ता वळवला आला. जगताप यांच्या गाडीच्या पुढे एक एसटी बस जात होती. ती तिसऱ्या लेनमधून जात होती. मात्र पुढे रस्ता बंद असल्याचे लक्षात आल्यावर एसटी चालकाने अचानकपणे लेन बदलून गाडी थेट पहिल्या लेनमध्ये आणली. त्यावेळी त्या लेनमधून जगताप यांचे वाहन भरधाव वेगाने जात होते. लेन बदलून अचानक एसटी बस पुढे आल्याने जगताप यांच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्यामुळे गाडी बसवर मागील बाजूने धडकली. नगरकर नागरिकांचे प्रेम आणि आशीर्वाद यामुळे आपण भयंकर संकटातून सुखरूप बचावलो, अशी प्रतिक्रिया जगताप यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

COMMENTS