कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांवर फार मोठा परिणाम झाला आहे.
पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांवर फार मोठा परिणाम झाला आहे. मात्र, पुन्हा लॉकडाऊन झाल्यास कोरोनाविषाणूने नाहीतर उपासमारीने मरु. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन नको, अशी साद कष्टकरी वर्गाने राज्य व केंद्र शासनाकडे केली आहे.
वर्किंग पिपल चार्टर व कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे टाळेबंदीनंतरचे वर्ष याबाबत कष्टक-यांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, उमेश ड़ोर्ले, विनोद गवई, इरफान चौधरी, माधुरी जलमुलवार, वंदना थोरात, सीमा शेख, रूपाली शिंदे, राणी शारद, सपना जाधव, पललवी देवकुळे, विमल झोबाडे, जालिंदर गायकवाड, युवराज काळे, मधुकर वाघ आदी उपस्थित होते. काशिनाथ नखाते म्हणाले, श्रमिक वर्गातील 80 % कामगारांचा लॉकडाउनमुळे रोजगार हिरावला गेला. त्यामध्ये मजूर, श्रमिक, फेरीवाले, बांधकाम कामगार, घरकाम महिला, कंत्राटी कामगार, रिक्षाचालक यांचा समावेश आहे. आधीच उत्पन्न कमी आणि बचत नसल्यामुळे देशभरातील 58% मजुराने कर्ज काढून या कालावधीमध्ये पोट भरले.
COMMENTS