Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेमुदत उपोषणाच्या इशार्‍याने पाईप लाईन कामास प्रारंभ

इस्लामपूर / प्रतिनिधी : गेले अनेक दिवस विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रमभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आनंदनगर, नेहरूनगर या परिसरात पिण्याचे पाण्याची

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने भरवलेल्या प्रदर्शनाला महिलांनी भेट द्यावी : डॉ. नीलम गोर्‍हे यांचे आवाहन
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची जिल्हा माहिती कार्यालयाकडून गावोगावी प्रसिध्दी
वाढणार्‍या वीजेच्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर महावितरणची वीज चोरीविरोधात कडक मोहीम

इस्लामपूर / प्रतिनिधी : गेले अनेक दिवस विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रमभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आनंदनगर, नेहरूनगर या परिसरात पिण्याचे पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. त्यासाठी प्रेशर पाईप लाईन टाकणे आवश्यक होते. वारंवार इस्लामपूर नगरपालिका प्रशासनाकडे मागणी करून सुध्दा प्रशासन टाळाटाळ करत होते. त्यासाठी नगरपालिकेवर तीन आंदोलने झाली. प्रशासन चाल ढकल करत असल्यामुळे मंगळवार, दि. 26 रोजी इस्लामपूर तहसिल कार्यालयासमोर विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्या परिसरातील महिला व पुरुष बेमुदत उपोषणाच्या इशार्‍याने पाईप लाईन कामास सुरवात करण्यात आली.
उपोषणाचे पत्र जिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलीस स्टेशन, व मुख्याधिकार्‍यांना देण्यात आले होते. उपोषण तीव्रपणे होणार हे लक्षात येताच तहसिलदारांनी नगरपालिकेच्या प्रशासनाला तातडीने कारवाई करावी, असे लेखी पत्र दिले. पोलीस अधिकार्‍यांनी सुध्दा फोनवरून त्या संदर्भात चर्चा केली. आंदोलनाचे गांभीर्य नरगपालिका प्रशासनाने ओळखून रात्री प्रभारी पाणी पुरवठा अधिकारी अविनाश जाधव यांना पाठवून देवून विक्रम पाटील व उपोषणास बसणार्‍या नागरिकांना सर्व यंत्रणा देतो. रात्रीत तुम्ही सर्वजण स्वतः उभे राहून काम पुर्ण करून घ्या, अशी विनंती केली. यावेळी आंदोलनात अनेक महिला व पुरुषांनी भाग घेतलेला होता. त्या सर्वांच्या हस्ते रात्री 11 वा. चे सुमारास कामाचा नारळ फोडून शुभारंभ झाला. विकम पाटील व परिसरातील नागरिकांनी रात्रभर कामकाज चालू करून पाईपलाईनचे काम पूर्ण करून घेतले.
यावेळी धनश्री चव्हाण, मंगल जाधव, संजय कुरणे, माधुरी पाटील यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांना विकम पाटील यांनी केलेल्या विकास कामांच्या कामांची प्रशंसा करून असेच लोकप्रतिनिधी आम्हाला आमच्या प्रभागात पाहिजेत, असे सांगितले. याप्रसंगी लोकांनी प्रत्यक्ष कामस सुरुवात झाल्यानंतर परिसरात फटाक्याची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.

COMMENTS