Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तरडगाव येथे मातेकडून चिमुकल्याचा खून

लोणंद / वार्ताहर : तरडगाव (ता. फलटण) येथे जन्मदात्या आईनेच आपल्या पाच महिन्याच्या चिमुकल्याचा ब्लँकेटमध्ये गुंडाळून उशीने नाक, तोंड दाबून खून केल

भाजपचे विचार तळागाळा पर्यंत पोहचवणार : ना. सत्यपालसिंह बघेल
तडीपार आदेशाचा भंग करणार्‍या गुंडास अटक
कराडचा सिध्दांत सिंहासने अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत देशात 17 वा

लोणंद / वार्ताहर : तरडगाव (ता. फलटण) येथे जन्मदात्या आईनेच आपल्या पाच महिन्याच्या चिमुकल्याचा ब्लँकेटमध्ये गुंडाळून उशीने नाक, तोंड दाबून खून केला. या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. आईला लोणंद पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता तिला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या महिलेने आपल्या बाळाचा खून का केला? याचा पोलीस तपास करत आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, पांढरी तरडगाव (ता. फलटण) येथे आरती सोमनाथ गायकवाड ही महिला राहते. या महिलेने लोणंद पोलीस स्टेशनला फोन करुन तिच्या पाच महिन्याच्या बाळाला 12 एप्रिल रोजी दुपारी ठार मारुन पुरले आहे. तुम्ही लगेच गाडी पाठवा. नाहीतर मी आणखी दुसर्‍या कोणाचा तरी खून करीन, असे सांगितले होते.
तात्काळ पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल काळे, पोलीस नाईक वाघमोडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अहिवळे यांनी जाऊन खात्री केली. यावेळी महिलेने आपला मुलगा कार्तिक सोमनाथ गायकवाड याला ब्लँकेटमध्ये गुंडाळले. उशीने नाक, तोंड दाबून त्याचा खून केला. यानंतर मृतदेह पुरल्याचे सांगितले. वाई उपविभागाच्या पोलीस अधीक्षक शितल जानवे-खराडे, लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर घटनास्थळी दाखल झाले.
चिमुकल्याचा मृतदेह पुरला होता. त्या ठिकाणी खोदले असता मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे शवविच्छेदन जागेवरच तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी केले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल काळे यांनी लोणंद पोलिसांत फिर्याद दिली. संशयित महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

COMMENTS