Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोलापुरातील एनटीपीसी केंद्राकडून 525 मेगावॅटची वीजनिर्मिती सुरू

मुंबई / प्रतिनिधी : वाढते तापमान व कोळशाच्या तीव्र टंचाईमुळे विजेची वाढती मागणी व उपलब्धता यातील तूट भरून काढण्यात महावितरणच्या वेगवान प्रयत्नांना यश

मनेका गांधी जीवदया निर्मल हॉस्पिटल उभारणीचा पंचनामा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेतून 1119 नवीन वीजजोडण्या
शेततळ्यात बुडून सख्ख्या भावंडांचा मृत्यू; पाटण तालुक्यातील रोमणवाडी येथील दुर्दैवी घटना

मुंबई / प्रतिनिधी : वाढते तापमान व कोळशाच्या तीव्र टंचाईमुळे विजेची वाढती मागणी व उपलब्धता यातील तूट भरून काढण्यात महावितरणच्या वेगवान प्रयत्नांना यश येत आहे. त्यानुसार सोलापूर येथील एनटीपीसी वीजनिर्मिती केंद्राकडून आणखी 525 मेगावॅट वीज उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आज शनिवार, दि. 16 रोजी सकाळी 7 वाजल्यानंतर राज्यात कोणत्याही ठिकाणी महावितरणने विजेचे भारनियमन केले नाही.
विजेची वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणने एनटीपीसीच्या सोलापूर, मौदा व गदरवारा या वीजनिर्मिती कंपन्यांकडून 673 मेगावॅटचा अतिरिक्त कोटा उपलब्ध करून घेतला आहे. तसेच दि. 6 एप्रिल 2022 रोजी सोलापूर वीजनिर्मिती केंद्र यातील संच क्रमांक दोन तांत्रिक कारणास्तव बंद झाल्याने जवळपास 525 मेगावॅटची वीज कमी मिळत होती. यासंबंधी महावितरणने एनटीपीसीसोबत संपर्क साधून दुरुस्तीचे काम लवकरात-लवकर करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आल्याने सदर संच आज दि. 16 एप्रिल रोजी कार्यान्वित झाली. त्यामुळे आज या संचामधून 525 मेगावॅट विजेची उपलब्धता वाढली असल्यामुळे राज्यातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तथापि, मागील दोन दिवसांपासून खुल्या बाजारामधून महावितरणकडून 1500 ते 2000 मेगावॅट विजेची खरेदी करण्यात येत असल्यामुळे या शुक्रवार (15 एप्रिल) व शनिवार (16 एप्रिल) या दोन दिवसात राज्यात भारनियमन करण्यात आले नाही. त्याचप्रमाणे रतन इंडिया (1200 मेवॅ), साई वर्धा (240 मेवॅ) व जीएमआर, वरोरा (200 मेवॅ) इत्यादीकडून वीज करारानुसार वीज उपलब्ध होत आहे. महानिर्मितीकडून करारीत 9540 मेगावॅट औष्णिक क्षमतेपैकी 6800 ते 7000 मेगावॅट तसेच एनटीपीसीकडून करारीत 5732 मेगावॅटपैकी 4400 मेगावॅट इतकी वीज उपलब्ध होत आहे. महानिर्मिती व एनटीपीसीसोबत करारीत क्षमतेप्रमाणे वीज उपलब्ध होण्याकरिता देखील महावितरणकडून सतत पाठपुरावा करण्यात येत आहे. सदरची वीज उपलब्ध झाल्यास ग्राहकांना भारनियमनमुक्त करणे शक्य होईल.

COMMENTS