महाविकासच्या भारनियमाला राष्ट्रवादीचा पहिला विरोध

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविकासच्या भारनियमाला राष्ट्रवादीचा पहिला विरोध

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेल्या इमर्जन्सी लोडशेडींगला या आघाडीचा घटक पक्ष असलेल्या नगर राष्ट्रवादीने पहिला

संजय अमोलिक यांचा अध्यापन कार्यगौरव पुरस्काराने गौरव
प्रवरा कारखान्याचा तीन हजार भाव, इतरांचे मात्र तोंडावर बोट
सासरच्यांनी केलेल्या मारहाणीत विवाहितेच्या वडिलांचा मृत्यू | LOKNews24

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेल्या इमर्जन्सी लोडशेडींगला या आघाडीचा घटक पक्ष असलेल्या नगर राष्ट्रवादीने पहिला विरोध नोंदवला आहे. नगर शहरामध्ये सुरु असलेले भारनियमन त्वरीत बंद करा, अशी मागणी राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी केली आहे. अघोषित भारनियमन रद्द करा व येत्या आठ दिवसात वीज पुरवठा सुरळीत करा. अन्यथा, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शहरामध्ये सध्या प्राथमिक तसेच माध्यमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परिक्षा सुरु आहेत. पण, वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे सध्या शहरात सर्व धर्माचे धार्मिक सणांचे वातावरण आहे. रामनवमी, रमजान महिना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती अशा स्वरुपाचे धार्मिक सण, उत्सव मोठ्या प्रमाण सुरु आहेत. अशा स्थितीत कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे ऐन उत्सवाच्या काळात वीज पुरवठा खंडीत झाल्याने उत्सव साजरे करण्यास अडचणी निर्माण होत आहे. या पार्श्‍वभूमीवर नगरमध्ये महावितरण कार्यालयात शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंगळवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष खोसे, जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते, महिला जिल्हाध्यक्ष रेश्माताई आठरे, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, जॉय लोखंडे, अंजली आव्हाड, संतोष ढाकणे, खंडू काळे, नितीन लिगडे, सीताराम काकडे, दीपक खेडकर, रुपेश चोपडा, गजेंद्र भांडवलकर, अमित खामकर, संजय दिवटे, यश लिगडे, निलेश घुले, महेंद्र कवडे, देवीदास टेमकर, अलिशा कांबळे, मिलिंद शिंदे, संजय खताडे, सुदर्शन ढवळे उपस्थित होते.

अघोषित भारनियमन थांबवा
अहमदनगर शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवेळी अचानकपणे कुठलीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडीत केला जातो. त्यामुळे नागरीकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे व नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. नगर शहरामध्ये सध्या तीव्र स्वरुपाचा उन्हाळा जाणवत आहे. सुमारे 42 च्या वर तापमान असल्यामुळे नागरीक उन्हाळयामुळे त्रस्त झाले आहेत. वीज पुरवठा वेळोवेळी खंडीत होत असल्यामुळे उन्हाळ्यात नागरीकांना रात्र जागून काढावी लागत आहे. याच बरोबर अधिकारी व कर्मचारी संपर्क साधला असता दूरध्वनी उचलत नाही. नागरिकांना अघोषित भारनियमनाची कुठलीही पूर्वसूचना मिळत नाही त्यामुळे चालू असलेले अघोषित भारनियमन रद्द करा व येत्या आठ दिवसात वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा खोसे यांनी दिला.

बेजबाबदारपणाचा आरोप
महावितरणच्या कर्मचार्‍यांच्या बेजबाबदार कारभारामुळे भारनियमनाला शहरातील जनतेला सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा रात्री-अपरात्रीच्या वेळी शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडीत केला जात असल्यामुळे रात्रीच्या वेळेस चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे अहमदनगर शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये भारनियमन करु नये. अन्यथा कोणतीही पूर्व सूचना न देता आपल्या कार्यालयामध्ये आदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

COMMENTS