Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिल्व्हर ओकवरील हल्ला पूर्व नियोजित कट : ना. जयंत पाटील

इस्लामपूर : सिल्व्हर ओक वरील हल्ल्याच्या निषेध सभेत बोलताना ना. जयंत पाटील. शेजारी विजयराव पाटील, पै. भगवान पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, शहाजी पाटील, खंड

ठाण्यात एका रात्रीत उपचारादरम्यान 17 रुग्णांच्या मृत्यू; अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे संकेत
कराडचा सिध्दांत सिंहासने अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत देशात 17 वा
महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर गृह राज्यमंत्र्यांकडून बंदोबस्तांची पहाणी

इस्लामपूर / प्रतिनिधी : आमचे राष्ट्रीय नेते खा. शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला हा पूर्व नियोजित कट आहे. आम्ही या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करतो. एसटी कर्मचार्‍यांना कोणी फूस लावली, या हल्ल्याच्या मागे कोण-कोण आहे? याचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील निषेध सभेत केली. यावेळी तहसिलदार प्रदीप उबाळे यांना निवेदन देण्यात आले.
येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्टीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या बंगल्यावर एस. टी. कर्मचार्‍यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला. वाळवा तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसने या निषेध सभेचे आयोजन केले होते. प्रा. शामराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. चिमन डांगे, पै. भगवान पाटील, खंडेराव जाधव, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकध्यक्षा सुनीता देशमाने, शहराध्यक्षा रोझा किणीकर, युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, कार्याध्यक्ष देवराज देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
ना. पाटील म्हणाले, न्यायालयाच्या निकालानंतर पेढे वाटले. गुलाल उधळला आणि दुसर्‍या दिवशी हल्ला कसा झाला? देश व राज्यातील ही पहिलीच घटना आहे. पवारसाहेबांच्या घराबाहेर फारसे सुरक्षा रक्षक नसतात. ते बाहेरही फारशी सुरक्षा यंत्रणा घेत नाहीत. याचा गैरफायदा घेत हा पूर्व नियोजित कटातून हल्ला केला आहे. देश व राज्यातील जनतेला खा. पवार दोषी असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी सोबत कॅमेराही नेलेला आहे. सदावर्ते यांना हल्लयापूर्वी कोण-कोण भेटले, त्यांचा कोणा-कोणाशी संपर्क झाला आहे. याचा शोध पोलिसांनी घ्यावा आणि या कटाचा मास्टर माईंड शोधून काढावा. अन्यथा देशात झुंडशाही वाढेल. हल्ल्यात एसटी कर्मचारी नव्हे तर पूर्व नियोजित झुंड होती. राज्यातील प्रश्‍न, असंतोष कसा वाढेल, त्याचा अतिरेक कसा होईल याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत आहे. सत्ता नसल्याने अस्वस्थता समजू शकतो. मात्र, त्यांनी सनदशीर मार्गाने कायद्याच्या चौकटीत राहून प्रयत्न करावेत. चौकट मोडण्याचा प्रयत्न करू नये.
यावेळी माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे, राष्ट्रवादीचे तालुकध्यक्ष विजयराव पाटील, राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकध्यक्षा सुनीता देशमाने, शहराध्यक्षा रोझा किणीकर, युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव यांनीही खा. पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला.
प्रारंभी शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. युवक तालुका कार्याध्यक्ष देवराज देशमुख यांनी आभार मानले.

COMMENTS