Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फायद्यासाठी पक्ष बदलणार्‍या नाईकांना जनता थारा देणार नाही : सम्राट महाडीक

इस्लामपूर / प्रतिनिधी : माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी संस्थांचा राजकारणासाठी वापर केल्याने त्या अडचणीत आल्या आहेत. नाईक यांच्या संस्था अडचणीत

वरकुटेच्या मुली सलग दुसर्‍यांदा कबड्डीत राज्यात अव्वल; चार मुलींची राज्याच्या संघात निवड
नाबार्डच्या माध्यमातून सोनगाव-कुमठे रस्त्याच्या पूलासाठी 7 कोटी 30 लाखांचा निधी
त्या निकालाचे न्यायालयाने मूल्यमापन करावे; सीबीआय संचालक मुदतवाढ याचिका

इस्लामपूर / प्रतिनिधी : माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी संस्थांचा राजकारणासाठी वापर केल्याने त्या अडचणीत आल्या आहेत. नाईक यांच्या संस्था अडचणीत आल्या. त्याचा भाजप पक्ष व इतरांचा संबंध येतोच कुठे? स्वार्थासाठी सातत्याने पक्ष व राजकिय भूमिका बदलणार्‍या नाईक यांना जनता आता थारा देणार नाही, असा पलटवार भाजप कार्यसमीतीचे सदस्य सम्राट महाडीक यांनी शिवाजीराव नाईक यांच्यावर केला आहे.
याबाबत पत्रकारांशी बोलताना सम्राट महाडीक म्हणाले, भाजप पक्ष सोडताना नाईक यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माझ्यावर टीका केली आहे. भाजपमुळे आमच्या संस्था अडचणीत आल्याचे ते सांगत आहेत. मुळातच त्यांनी आजपर्यंत राजकारणासाठी संस्थांचा वापर केला आहे. त्यामुळे संस्था अडचणीत आल्या. यामध्ये कोणत्या पक्षाचा व व्यक्तीचा संबंध येत नाही. ते ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले. तो पक्ष मतदारसंघात वाढावा यासाठी त्यांनी किती योगदान दिले? असा सवाल उपस्थित करून महाडीक म्हणाले, शिवाजीराव नाईक व त्यांच्या संस्था अडचणीत याव्यात. म्हणून कोणाचा हस्तक्षेप असण्याचा प्रश्‍न नाही. तसेच विधानसभेला माझ्या बंडखोरीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व इतर कोणाचेही पाठबळ नव्हते. त्यामुळे चंद्रकांत पाटलांवर बिनबुडाचे आरोप करणे योग्य नाही. नाईक यांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास पाहिला तर त्यांनी स्वार्थासाठी सातत्याने पक्ष बदलले आहेत. त्यामुळे त्यांच्या जाण्याने भाजप पक्षाला काहीही फरक पडणार नाही. सतत पक्ष बदलणार्‍या नाईक यांना शिराळा मतदार संघातील जनता आता थारा देणार नाही. जनता नाईक यांना त्यांची जागा दाखवून देतील, असेही ते म्हणाले.

COMMENTS