Homeकृषी

सातारा तालुक्यातील गोजेगाव येथील 60 एकर ऊस जळून खाक

सातारा / प्रतिनिधी : सातारा तालुक्यातील गोजेगाव येथील धारकारा, मोडा, देशमुख शिवारातील सुमारे 60 एकर ऊस जळून खाक झाला. यामध्ये सुमारे शंभरहून अधिक शेत

कबुतरखाना मानवी आरोग्य आणि भूतदया ; मानवी आरोग्यापेक्षा कबुतरखाना महत्वाचा का?
साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी दूरगामी धोरण आखा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शेतकर्‍यांचे आझाद मैदानावर आंदोलन; प्रसंगी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा

सातारा / प्रतिनिधी : सातारा तालुक्यातील गोजेगाव येथील धारकारा, मोडा, देशमुख शिवारातील सुमारे 60 एकर ऊस जळून खाक झाला. यामध्ये सुमारे शंभरहून अधिक शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा शेतकर्‍यांनी आरोप करुन नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
गोजेगाव परिसरात उसाची लागण मोठ्या प्रमाणावर आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गोजेगाव येथील कृष्णा नदीच्या पूर्वेकडून अचानक आगीचा लोट आला. वार्‍यामुळे ही आग मोडा, देशमुख व धारकारा या नावाने ओळखल्या जाणार्या शिवारातील ऊसाला लागली.
वार्‍यामुळे आगीच्या झळा एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत्या. क्षणार्धात सुमारे पन्नास ते साठ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. देशमुखनगर शिवारातील हरभरा-गव्हाच्या पिकालाही आगीची झळ बसली. यामध्ये या परिसरातील सुमारे शंभरहून अधिक शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

COMMENTS