चळवळीचे मारेकरी

Homeताज्या बातम्यासंपादकीय

चळवळीचे मारेकरी

भारतात अनेक चळवळी उदयाला आल्या आणि संपल्या. भारतातील अनेक चळवळींनी पुरोहितवादी धार्मिक जीवघेण्या रूढी- परंपरा  नष्ट केलेल्या आहेत. सामाजिक चळवळी

अर्थसंकल्प आणि शेतकरी
वारकर्‍यांवर लाठीमार करण्याचे पातक…
विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राची भरारी

भारतात अनेक चळवळी उदयाला आल्या आणि संपल्या. भारतातील अनेक चळवळींनी पुरोहितवादी धार्मिक जीवघेण्या रूढी- परंपरा  नष्ट केलेल्या आहेत. सामाजिक चळवळी समाजव्यवस्थेत अनुकूल स्वरूपातून सामाजिक बदल घडवून आणतात. यांमध्ये समाजहिताच्या बाजूने बदल घडवून आणण्यासाठी किंबहुना समाजामधील विषमता आधारित परंपरेला संघटितपणे विरोध करण्यासाठी समाजातील असंख्य व्यक्तीनी एकत्र येऊन सामाजिक समतेसाठी हेतुपूर्वक केलेला प्रयत्न म्हणजे सामाजिक चळवळ अशी चळवळीची साधक बाधक व्याख्या करता येऊ शकते. या संदर्भात रुडाल्फ हेर्बेल, नील स्मेल्सर, जॉन विल्सन, ड्रेसलर व विलिस, हर्बर्ट ब्लूमर, टर्नर व किलियन, लुंडबर्ग, जे. आर. गसफील्ड इत्यादी समाजशास्त्रज्ञ-विचारवंतांनी ‘सामाजिक चळवळ’ या शब्दाच्या व्याख्या केलेल्या आहेत. पार्थ मुखर्जी यांच्या मते, ‘सामाजिक चळवळ ही सर्वसमावेशक, पर्यायी आणि आमूलाग्र बदल घडवून आणण्यास सक्षम असते’. कुठल्याही चळवळीचे काही टप्पे ठरलेले असतात. यामध्ये चळवळीची प्राथमिक अवस्था, संघटन अवस्था, संस्थागत अवस्था, विनाश अवस्था यातून चळवळीची वाटचाल होत असते. आपल्याकडे साधारण कामगार चळवळ, आदिवासी चळवळ, दलित चळवळ, मागासवर्गीयांची चळवळ, स्त्री चळवळ, कष्टकरी चळवळ, विद्यार्थी चळवळ, मध्यमवर्गीय चळवळ, मानवी हक्क आणि पर्यावरणवाद्यांची चळवळी प्रभावी कामे करतांना दिसतात. समाजव्यवस्थेत सापेक्षत: संपूर्ण, अचानक आणि सामान्यत: हिंसक मार्गाने घडून येणारे परिवर्तन म्हणजे क्रांती होय. क्रांतीमुळे समाजात हळुहळु, टप्प्याटप्प्यांने, शांतततामार्गाने, सातत्याने घडून येणाऱ्या व्यापक स्वरूपाचे परिवर्तन घडून येते. परिवर्तनाला विरोध करून पंपरागत मूल्ये, विचारप्रणाली यांकडे अधिक लक्ष देऊन पूर्ववत स्थिती पुन्हा अस्तित्वात आणण्याचा उद्देश पुनरुज्जीवनवादी चळवळीचा असतो. हिला प्रतिगामी चळवळ असेही म्हणतात. ही चळवळ परिवर्तनात्मक विकास न घडवता अधोगतीचे प्रतिक म्हणून कार्य करते. पुन्हा मागे जाणे, हा या चळवळीचा उद्देश असतो. आणि आज सर्व परिवर्तनवादी चळवळीत चंगळवादी कार्यकर्त्यांमुळे सामाजिक चळवळीचे परिवर्तनाचे चक्र मंदावले आहे, किंबहुना ते उलटे फिरू लागले आहे. सामाजिक चळवळीमध्ये आपल्याकडे एन. जी. ओ कार्यकर्त्यांचा शिरकाव झाल्यामुळे मोठी गडबड झालेली आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या विविध लाभाच्या योजनेमुळे देखील चळवळीची गती कमी झाली आहे असे म्हणता येईल. या लाभाच्या योजना देऊन धोरणकर्त्यानी विविध चळवळीची धग कमी केलेली आहे. राज्यकर्त्यांना किंबहुना ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती आणि सामाजिक दर्जा असतो त्यांना इथे आहे ती व्यवस्था कायम ठेऊन पुढे जायचे असते. म्हणजे, ज्यांच्याकडे गमवण्यासारखे खूप काही असते त्यांना इथे क्रांती नको  असते तर ज्यांच्याकडे गमवण्यासारखे काहीच नसते ते क्रांतीच्या अग्रस्थानी असतात. हे अग्रस्थानी असलेले जे कार्यकर्ते असतात त्यांना एक भूमिका असते. त्यांचे उद्देश ठरलेले असतात. मात्र ज्यांच्याकडे भूमिकाच नसते असे  चळवळीतील कार्यकर्ते  एन. जी. ओच्या माध्यमातून चळवळी करतात तर काहीजण विविध राजकीय पक्षाच्या कामगार सेलचे कामे करत असतात. मात्र त्यांच्या या भूमिकेला प्रश्न चिन्ह लावता येते. कारण चळवळीमध्ये काम करत असतांना असे एन. जी. ओ मधले आणि विविध राजकीय पक्षाच्या कामगार सेलचे कार्यकर्ते हे चळवळीच्या माध्यमातून आपल्या पोटाचा प्रश्न देखील सोडवत असतात. पोटाचा प्रश्न घेऊन जे-जे चळवळीत काम करतात ते सर्व चळवळ पोटात टाकून चळवळीला संपवण्याचे काम करत असतात. हे चळवळीचे खरे मारेकरी असतात. आणि असे चळवळीचे मारेकरी कामगार चळवळ, आदिवासी चळवळ, दलित चळवळ, मागासवर्गीयांची चळवळ, स्त्री चळवळ, कष्टकरी चळवळ, विद्यार्थी चळवळ, मध्यमवर्गीय चळवळ, मानवी हक्क आणि पर्यावरणवाद्यांची चळवळ या चळवळीला घातक आहेत.

COMMENTS