रंग लावण्यासाठी महिलेची छेड, दोनजणांविरुद्ध गुन्हा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रंग लावण्यासाठी महिलेची छेड, दोनजणांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर/प्रतिनिधी- दुचाकीवरून जाणार्‍या पती-पत्नीचा पाठलाग करून रंग लावण्यासाठी महिलेची छेड काढणार्‍या अमोल साबळे व अक्षय साबळे (पूर्ण नाव, पत्ता माह

उड्डाणपुलाच्या कामासाठी शासकीय जमीन कमी संपादन करत खाजगी जमीन जास्त संपादन करत असल्याचा आरोप
* निघोज कुरुंद पठारवाडी पुन्हा कोरोना हॉटस्पॉट! l पहा LokNews24*
बनावट दस्तऐवज करून प्लॉटची परस्पर विक्री, चौघांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर/प्रतिनिधी- दुचाकीवरून जाणार्‍या पती-पत्नीचा पाठलाग करून रंग लावण्यासाठी महिलेची छेड काढणार्‍या अमोल साबळे व अक्षय साबळे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) या दोनजणांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. एक महिला तिच्या पतीसोबत रामवाडीकडून कोठल्याकडे दुचाकीवरून जात असताना अमोल व अक्षय यांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला. महिलेकडे पाहून शिट्टी वाजवत, थांब आम्हाला तुला रंग लावायचा आहे, तुझ्यासोबत रंगपंचमी खेळायची आहे, असे म्हणत त्यांचा कोठला स्टँडपर्यंत पाठलाग केला. तेथे महिलेच्या पतीने दुचाकी थांबविली आणि तुम्ही आमचा पाठलाग का करता? तुम्ही का माझ्या पत्नीला पाहून शिट्टी मारता’, असे विचारल्यावर अमोल ते त्या महिलेच्या पतीला म्हणाले, आम्हाला तुझ्या बायकोसोबत रंगपंचमी खेळायची आहे, असे म्हणत त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्याच्या नोंद केली आहे.

COMMENTS