Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा लगतच्या भेंडवडे इनमदारवाडी येथे वृक्षतोड

10 ते 12 ट्रक लाकूडाचा साठा; विरप्पन कोण? अधिकार्‍यांसमोर प्रश्‍नचिन्हशिराळा / प्रतिनिधी : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वृक्ष तोडीची घटना ताजी अ

इस्लामपूर येथील 400 कुटुंबियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी
अजिंक्यतारा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध
बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी एकास 20 वर्षाची सक्त मजूरी

10 ते 12 ट्रक लाकूडाचा साठा; विरप्पन कोण? अधिकार्‍यांसमोर प्रश्‍नचिन्ह
शिराळा / प्रतिनिधी : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वृक्ष तोडीची घटना ताजी असताना आता प्रकल्पा लगत असलेल्या भेंडवडे इनामदारवाडी, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वृक्ष तोड झाली आहे. माहिती मिळताच शाहुवाडीचे वन अधिकारी यांनी धाड टाकून माल ताब्यात घेत पंचनामा केला. अंदाजे 5ते 6 ट्रक लाकूड साठा असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, गेल्या अनेक महिन्यापासून या ठिकाणी वृक्ष तोड सुरु असूनही अधिकार्‍यांना याची कल्पना नाही, याबाबत शंका उपस्थित होत आहे. अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने तोड सुरू असल्याचे बोलले जात आहे. तोडीमधील विरप्पन कोण शोधणे गरजेचे आहे. मानद वन्य जीव रक्षक रोहन भाटे यांना त्यांच्या खबर्‍याकडून मिळालेल्या गुप्त माहितीवरून कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प लगत असलेल्या उदगिरी-इनामदारवाडी नजीक गट नं 302 व 303 मध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड सुरू असल्याचे माहिती दिली.
हा भाग इकोसेनसीटीव्ह झोन व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प लगत असलेल्या प्रादेशिक वन विभागातील असल्याने तात्काळ भाटे यांनी मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर एम. रामनुजम, उपवनसंरक्षक आर. आर. काळे तथा वनक्षेत्रपाल अमित भोसले यांना याबाबत अवगत केले. वनक्षेत्रपाल अमित भोसले व त्यांचे वनपाल व इतर वनरक्षक हे तातडीने घटनास्थळी पोहचले व सर्व प्रत्यक्ष तोड झालेले जवळपास दहा ट्रक लाकूड-वृक्ष तोड झाली असल्याचे भयानक दिसले. दोन दिवस पंचनामा सुरू होता. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
दरम्यान, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा शेजारी झालेली मोठी बेकायदेशीर वृक्ष तोड आहे. यामुळे निसर्गाची मोठी हानी झाली आहे. वनक्षेत्रपाल अमित भोसले, वनरक्षक अक्षय चौगले, विठ्ठल खराडे, आबासाहेब परीट, विशाल पाटील, वनपाल गारदी यांनी ही कारवाई केली. वनक्षेत्रपाल अमित भोसले यांच्याशी संपर्क केला. पण त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. सुरवातीला 4 ट्रक लाकूड असल्याचे सांगून विषय बदलला. पण पुन्हा ते म्हणाले, वृक्ष तोड सुरू असल्याचे आम्हाला कल्पना नव्हती. पण माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. लवकरच कारवाई करू.

COMMENTS