Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीग पर्व दुसरेचे सुपर सिक्सर विजेते

द्वितीय अजित पाटील पॅथर्स; स्व. चंद्रकांत पाटील स्पोर्टस तृतीयइस्लामपूर / प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज चौक प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरेचे प्

सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा झटका
विराट -अनुष्का दुसऱ्यांदा होणार आईबाबा होणार?
Sangamner : महिला बॉक्सिंग राज्यस्तरीय स्पर्धेत ऋतूजा राहाणेला कांस्य पदक (Video)

द्वितीय अजित पाटील पॅथर्स; स्व. चंद्रकांत पाटील स्पोर्टस तृतीय
इस्लामपूर / प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज चौक प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरेचे प्रथम क्रमांकाचे विजेते सनी माळी व पंकज पवार यांच्या सुपर सिक्सर संघ ठरला. द्वितीय पदाचे मानकरी अजित पाटील पँथर्स, स्व. चंद्रकांत पाटील स्पोर्टस तृतीय क्रमांक तर ओसवाल सुपर किंग्स चतुर्थ क्रमांक मिळवला आहे. या स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी नगरसेविका सौ. मनीषा जयवंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळ यांच्या वतीने सलग दुसर्‍या वर्षी लिग पध्दतीने प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या लीगमध्ये आठ संघ सहभागी झाले होते. यामध्ये सुपर सिक्सर संघ, अजित पाटील पँथर, जयंत ट्रेडिंग स्पोर्ट्स, ओसवाल सुपर किंग, रेणुका स्पोर्ट्स, आर. पी. टायगर्स, वैभव पवार, स्व. चंद्रकांत पाटील स्पोर्ट्स अशा संघांचा समावेश होता.
यासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख रक्कम 35000 व पारितोषिक, सतेज जयवंत पाटील भैय्या यांच्यातर्फे तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 21000 रुपये छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळ, तृतीय क्रमांकाचे बक्षीस 7 हजार, अजित पाटील यांच्याकडून चतुर्थ बक्षीस क्रमांक 7000/- रणजीत जाधव मेजर यांच्याकडून देण्यात आले. सर्व चषक सुरज पाटील यांच्यातर्फे देण्यात आले. स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी अथर्व पाटील (सांगली, याला सायकल उपनगराध्यक्ष दादासो पाटील यांच्याकडून देण्यात आली.
शिवाजी महाराज चौक तरुण मंडळ हा नेहमी सामाजिक कार्यात कायम अग्रेसर राहिला आहे. तसेच खेळाडूंना आयपीएलचा अनुभव देण्याचे काम जिल्ह्यात प्रथमच या मंडळाने केले आहे. सर्व सामने युट्युब वर फेसबुक लाईव्ह दाखवण्यात आले. स्पर्धेसाठी सुरज पाटील, सतेज पाटील, अजित पाटील, रणजित जाधव, दादासाहेब पाटील, शिवाजी पवार यांचे अर्थसहाय्य व मोलाचे मार्गदर्शन लाभले. बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी विकास राजमाने, अजित पाटील, मानसिंग पाटील, वैभव पवार, संदीप वडार, अमोल पाटील, छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. स्पर्धेसाठी विशेष सहकार्य किचन किंगचे मालक संजय बिंदगे यांनी केले.

COMMENTS