Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोणेगावच्या गिर्यारोहकाने केला नानाचा अंगठा सर

मसूर / वार्ताहर : कोणेगावच्या मानसिंह चव्हाण या गिर्यारोहकाने जुन्नर तालुक्यातील नाणे घाटाच्या लगत असणारा 300 फूट उंचीचा प्रसिध्द नानाचा अंगठा सर केल

माजी खा. राजू शेट्टी यांची आक्रोश यात्रा आज सांगलीत
सातारा जिल्ह्यात एसटीच्या फेर्‍यांमध्ये वाढ; उत्पन्न वाढल्याने प्रशासनाकडून निर्णय
इस्लामपूर येथे एका व्यासपीठावर 35 जुळी; मुक्तांगण प्ले स्कूलचा अनोखा उपक्रम

मसूर / वार्ताहर : कोणेगावच्या मानसिंह चव्हाण या गिर्यारोहकाने जुन्नर तालुक्यातील नाणे घाटाच्या लगत असणारा 300 फूट उंचीचा प्रसिध्द नानाचा अंगठा सर केला. जुन्नर तालुक्यातील नाणेघाट हा प्राचीनकालीन व्यापारी मार्ग म्हणून ओळखला जातो.
सकाळी नऊ वाजता लीड क्लाईबिंगला सुरुवात केली. पुण्याचे तुषार दिघे यांनी सकाळी 11 वाजेपर्यंत पाहिले स्टेशन गाठले. कृष्णा मरगळे यांना बिले दिला. त्यानंतर मानसिंह चव्हाण यांनी चढाईस सुरुवात केली.
पहिला टप्पा सरळ उभा 30 फुट सलग बोल्ट टू बोल्ट चढाई करावी लागते. 30 फुटानंतर रूट थोडा उजव्या बाजूला वळून वरती गेला आहे. 30फुटांच्यावर असणारा क्लाईबर बिलेअरला दिसत नाही. वाहणार्‍या वार्‍यामुळे एकमेकांना कॉल देणे कठीण होते. मोठ-मोठ्या ठेलज्ञ झरींलह वर दोन दोन गिर्यारोहकांच्या जोड्या करून सायमंड पध्दतीने चढाई केली जाते. त्याचप्रमाणे या कातळ खडकावर चढाई करण्याचे ठरले होते. मात्र, प्रस्तर खडकाची काठीण्य पातळी जास्त असल्याचे निदर्शनास आले.
लीड क्लाइंबर तुषारने चढाई करत दुपारी 2 वाजता दुसरे स्टेशन गाठले. दुसर्‍या स्टेशनवर उभे राहण्यास देखील फारशी जागा नाही. त्यावेळी अचानक एक मोठा आवाज झाला क्षणभर सर्वजण शांत झाले. अंगठ्याच्या पलीकडे पश्‍चिमेकडील बाजूचा काही भाग निखळूण खाली कोसळला होता. मॅसिव्ह रॉक फॉल झाला. दरीच्या खाली उतारावर बराच वेळ दगड गडगडत जात होते. रॉकफॉल ही एक नैसर्गिक क्रिया असते.
दुसर्‍या स्टेशनपासून वरच्या बाजूला लुज रॉक सुरू होतो. ऊन-पावसामुळे काही मोठे बोल्डर मोकळे झाले आहेत. त्यांना धक्का न लागू देता क्लाइम्बिंग करणे खूप महत्वाचे असते.
अखेरच्या टप्प्यात क्रॅकमध्ये फुरसे असतेच असे म्हणतात पण सुदैवाने दर्शनही झाले नाही. अखेरचा टप्पा खालच्या तुलनेत चढाईस सोपा आहे पण वाळलेले गवत, लूज रॉक, स्क्री यामुळे जबाबदारीने चढाई करावी लागले. अखेर 4 वाजता लीड मॅन तुषार दिघे त्यापाठोपाठ मानसिंह चव्हाण व बिलेअर कृष्णा मरगळे यांनी नानाचा अंगठा सर केला.
पुण्याच्या अ‍ॅडव्हेंचर या टीमकडून ही चढाई करण्यात आली. लिडर्स सर्टीफाईड असून सर्व इक्विपमेंट ब्रँडेड असल्याने चढाईस आत्मविश्‍वास येतो. गिर्यारोहण सुरक्षित होते असे चव्हाण म्हणाले.
मानसिंह चव्हाण यांनी यापूर्वी अनेक साहसी मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. महाराष्ट्रातील अनेक गगनचुंबी सुळके त्यांनी सर केले आहेत.
त्यांचे बीएससीपर्यंतचे शिक्षण कराडच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात झाले आहे. त्यांनंतर चडल व चइअ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झाले.

COMMENTS