Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपूर येथे एका व्यासपीठावर 35 जुळी; मुक्तांगण प्ले स्कूलचा अनोखा उपक्रम

इस्लामपूर / प्रतिनिधी : एकाच वेळी विविध वयोगटातील जुळ्यांना पाहणे हा दुर्मिळ योगायोग आज 22-2-22 या तारखेला साधला गेला. इस्लामपुरच्या मुक्तांगण प्

म्हसवडचे माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा यांचे बेमुदत उपोषण सुरु
दडपशाहीला जनता कंटाळली : निशिकांत भोसले-पाटील
विकास कामांमुळे कॉलर उडविणार्‍यांचा लोकसभेला पराभव : सारंग पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : एकाच वेळी विविध वयोगटातील जुळ्यांना पाहणे हा दुर्मिळ योगायोग आज 22-2-22 या तारखेला साधला गेला. इस्लामपुरच्या मुक्तांगण प्ले स्कूलच्या प्रांगणात. ट्विन्स 22 उपक्रमात तब्बल 35 जुळी व्यासपीठावर आली. त्यांनी आपल्या कला सादर केल्या. चेहर्‍यातील प्रचंड साम्य आणि विविध वेशभूषेत आलेल्या जुळ्यांचा आविष्कार पाहून कार्यक्रमात रंगत आली.
इस्लामपूरातील मुक्तांगण प्ले स्कूल मुलांचे बालपण टिकवण्यासाठी गेली 11 वर्षे प्रयत्न करत आहे. दरम्यानच्या काळात तेरा जुळी आणि एक तिळ्याने मुक्तांगणमध्ये शिक्षणाचे पाहिले पाऊल टाकले आहे. हा इतिहास आणि आज मंगळवारी असणारी 22-2-22 अशी तारीख निवडली गेली. जुळ्यांना निमंत्रणे दिली गेली. सोशल मीडियावर या उपक्रमाची माहिती व्हायरल झाल्यावर उपक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळाला. नुकत्याच जन्मलेल्या बालपणापासून 55 वर्षे वयाच्या व्यक्ती या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.
जुळी मुले हा आजही समाजामध्ये कौतुकाचा व कुतूहलाचा विषय आहे. त्यामुळे मुक्तांगणमध्ये हा आगळा-वेगळा कौतुक सोहळा पार पडला. स्कूलच्या आवारात आकर्षक मंडप उभारण्यात आला होता. व्यासपीठावर फुग्यांनी सजावट केली होती. अनेकदा जुळी मुलं पहायला मिळत नाहीत. पण एकाच वेळी आलेली मुले पहायला पालकही उत्सुकता होती. पण आज योगा, डान्स, नाट्य, बडबडगीते, पोवाडा, पसायदान, बालगीते म्हटली.
या उपक्रमाबाबत मुक्तांगणचे सचिव विनोद मोहिते म्हणाले, वेगवेगळ्या उपक्रमांनी मुक्तांगणमध्ये चार वर्षाच्या आतील मुलांना अनुभव दिले जातात. दरवर्षी जुळी मुले वर्गात असणे हे आमच्या स्कूलचे वैशिष्ट्य आहे. याला जोड म्हणून अनोख्या तारखेला एकाच व्यासपीठावर जुळी आणण्याचा प्रयत्न होता. त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर यश मिळाले. सर्वांनी एन्जॉय केला.
मुक्तांगणच्या संचालिका सौ. वर्षाराणी मोहिते म्हणाल्या, अनोख्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. आजचा दिवस मुक्तांगणमुळे जुळ्यांना दीर्घकाळ लक्षात राहील. खुर्षद पटवेकर, धनश्री पाटील, भारती उथळे, आरती धोतरे यांनी संयोजन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ही जुळे आणि उपस्थित तिळे..!
मुक्तांगण आणि जुळी मुले असे समीकरण गेली 11 वर्षें आहे. आज मंगळवारी अनोख्या उपक्रमात तब्बल 35-जुळी सहभागी झाली. या कार्यक्रमाचे सर्वांनाच आकर्षण होते. गणेश, स्वरा, सई कुंभार या तीळ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. सर्व जुळ्यांना पाहण्यासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. एकाच वेळी अनेक जुळ्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

COMMENTS