Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपूर नगरपालिकेवर पिण्याच्या पाण्यासाठी घागर मोर्चा

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिकेवर विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रमभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवनगर, नेहरुनगर, आनंदनगर आदि भागातील मह

कडकनाथ महाघोटाळ्याच्या महारयत कंपनीच्या संचालकाला अटक
यवतमाळ जिल्ह्यातील 104 वर्षीय आजोबांची नायगावला भेट
यंदा रायगडी घुमणार राजधानीचा आवाज; राज्यभिषेक कलशाचे विधीवत पूजनास शिवभक्तांची उपस्थिती

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिकेवर विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रमभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवनगर, नेहरुनगर, आनंदनगर आदि भागातील महिला व पुरुषांनी घागर मोर्चा काढून इस्लामपूर पालिका प्रशासनाचा निषेध केला.
गेले अनेक दिवस या भागांतील नागरिकांनी वारंवार नगरपालिका प्रशासनाकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी मागणी करुनही प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत होते. त्याच्यामुळे नागरिकांच्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.
मोर्चासमोर बोलताना विक्रमभाऊ म्हणाले, नगरपालिका प्रशासन हे इस्लामपूरातील सर्वच कामे करण्यात अपयशी ठरलेले आहे. शहरातील जनतेच्या पैशातून शहराचा विकास केला जातो. प्रशासनाने बेजबाबदारपणाचे वागणे बंद करावे. नेहमीप्रमाणे मुख्याधिकारी नगरपालिकेत थांबले नाहीत. मोर्चातील महिलांचा प्रचंड आक्रोश पाहुन प्रशासन हादरुन गेले. तसेच मोर्चामधील महिलांनी आपल्या स्वत:च्या घरातील म्हैशी व शेळ्या तसेच एका शेतकर्‍याने आपली बैलगाडी तसेच महिलांनी डोक्यावर घागरी, जळणाचा बिंडा, जेवण करण्याचे सर्व साहित्य घेवून मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. मोर्चातील नागरिकांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
मुख्याधिकार्‍यांनी प्रभारी पाणी पुरवठा अधिकारी अविनाश जाधव व सतिश दंडवते या दोघांच्यामार्फत तातडीने पाणी पुरवठा सुरळीत करुन देण्यासाठी पाहणी करुन इस्टिमेट द्यायला सांगितले. लवकरात-लवकर पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावू, असे आश्‍वासन दिले. या मोर्चामध्ये बाळासाहेब पाटील, मोहन वळसे, सयाजी जाधव, मन्सूर नायकवडी, विशाल पाटील, मंगल जाधव, शांताबाई चव्हाण, रेश्मा मगदूम, सिकंदर पटेल, आरबाज मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.

COMMENTS