Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीत धुसपुस; पोकळी भरून काढण्यासाठी राहुल व सम्राट महाडिक यांचे प्रयत्न

इस्लामपूर / हिंम्मत कुंभार : शिराळा मतदार संघातील माजी मंत्री शिवाजीराव नाईक हे राष्ट्रवादीत जाण्याच्या वाटेवर आहेत. शिवाजीराव नाईक यांच्या राष्ट

करहर येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी; 151 दात्यांनी केले रक्तदान
मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर द्या : श्रीकांत देशपांडे
जयंतरावांचे कुटील कारस्थान उध्वस्त करणार : निशिकांत पाटील

इस्लामपूर / हिंम्मत कुंभार : शिराळा मतदार संघातील माजी मंत्री शिवाजीराव नाईक हे राष्ट्रवादीत जाण्याच्या वाटेवर आहेत. शिवाजीराव नाईक यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने शिराळा तालुक्यातील भाजपला खिंडार पडणार आहे. त्यामुळे शिराळा तालुक्यात भाजपमध्ये पोकळी निर्माण होणार आहे. तर नाईक यांच्या प्रवेशाने शिराळा तालुक्यातील राष्ट्रवादीत अंतर्गत धुसपुस सुरू झाली आहे. राहुल महाडिक व सम्राट महाडिक यांनी भाजपमध्ये निर्माण होणारी पोकळी भरून काढण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली असल्याची चर्चा शिराळा मतदारसंघात सुरू आहे.
शिराळा विधानसभा मतदारसंघाची रचना पाहता तेथे राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांचा प्रभाव असलेल्या वाळवा तालुक्यातील 48 गावे आहेत. या संपूर्ण मतदार संघातील प्रत्येक गावात काही ना काही प्रमाणात माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचे कार्यकर्ते आहेत. या 48 गावात महाडीक गटाचाही प्रभाव आहे. सन 2009 च्या निवडणुकीत बंडखोरी करून अपक्ष उमेदवार मानसिंगराव नाईक आमदार झाले होते. सन 2014 ला दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले त्यामुळे मानसिंगराव नाईक आणि काँग्रेसकडून सत्यजित देशमुख अशी मत विभागणी झाली आणि शिवाजीराव नाईक यांनी त्याचा फायदा घेत विजय मिळवला.
महाडिक बंधूंनी महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजप पक्षातील महाडिक गटाचे जाळे विणले आहे. यामुळे शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजप पक्षाची ताकद वाढत आहे. सम्राट महाडिक यांची युवा वर्गावर चांगलीच छबी निर्माण झाली आहे. दोंन्ही नाईक गटाचे कार्यकर्ते महाडिक गटात सामील होण्याच्या तयारीत असताना दिसत आहेत.
सत्यजित देशमुख हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्याने फारसा फरक पडलेला दिसत नाही. गत विधानसभा निवडणुकीत देशमुख गटाची मते शिवाजीराव नाईक यांना फारसी पडलेली दिसत नाहीत. मात्र, सम्राट महाडिक यांनी भाजप प्रवेश करून विधानसभा निवडणुकीत महाडीक गटाची वोट बँक तयार केली आहे. यामध्ये आता शिवाजीराव नाईक गटाचे समर्थक महाडिक गटात सामील झाले तर महाडिक गटाची ताकद वाढणार हे निश्‍चित आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवाजीराव नाईक यांचा प्रवेश जवळपास निश्‍चित मानला जात आहे. त्यांच्या प्रवेशाने सद्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये उदासिनता दिसून येत आहे. गत निवडणुकीत शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये दोन गट होते. त्याचा फायदा राष्ट्रवादीला मिळत होता. आता शिराळा विधानसभा मतदारसंघातील भाजप पक्षात फक्त महाडिक हा एकच गट शिल्लक राहिला आहे. यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली असली तरी अंतर्गत धुसपुस सुरू असणार आहे. धुसपुसीचा फायदा महाडिक गटाला नक्कीच होणार आहे.
एकंदरीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, विधानसभा निवडणुकीसाठी भाजप म्हणजे महाडिक गटाने ऐकला चलो चा नारा चालू केला आहे. शिराळा तालुक्यातील भाजपमध्ये निर्माण होणारी पोकळी भरून काढण्यासाठी राहुल व सम्राट महाडिक यांनी कंबर कसली आहे.

COMMENTS