महाराजांच्या पुतळ्यासमोर अश्‍लिल नृत्याची शिवसेना-राष्ट्रवादीला सवय : मनसेने केली टीका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराजांच्या पुतळ्यासमोर अश्‍लिल नृत्याची शिवसेना-राष्ट्रवादीला सवय : मनसेने केली टीका

अहमदनगर/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यात राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी व त्यांचे कार्यकर्ते चूम्मा दे गाण्यावर नृत्

आमदार जगतापांच्याविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करा : भाजपने केली मागणी
१७ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
दरोडा व खुनाच्या गुन्ह्यातील फरारी सराईत गुन्हेगार जेरबंद

अहमदनगर/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यात राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी व त्यांचे कार्यकर्ते चूम्मा दे गाण्यावर नृत्य करतात तर शिवजयंती मिरवणुकीत शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मुन्नी बदनाम हुई या गाण्यावर नाचतात. महाराजांचा पुतळा समोर ठेवायचा आणि आणि अश्‍लिल गाण्यांवर नृत्य करायचे ही सवयच राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्ही पक्षांना आहे, अशी टीका मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी व शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर फक्त स्वतःच्या प्रसिध्दी साठी करतात. चुम्मा दे गाण्यावर राष्ट्रवादी नाचते आणि मुन्नी बदनाम हुई हे गाणे शिवसेनेला आवडते. त्यामुळे हे दोघे एकाच माळेचे मणी आहेत, असा दावा करून भुतारे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमावरून नगर शहरात राजकारण सुरु झाले व खर्‍या अर्थाने लोकार्पण सोहळ्याचा श्रेयवाद पाहायला मिळत असताना अश्‍वारुढ नवीन पुतळ्याच्या नावाखाली गर्दी गोळा करून जनतेला व हिंदूंना फसविण्याचा प्रकार हा नगर शहरांतील लोकप्रतिनिधी व शिवसेनेच्या महापौरांनी केला आहे, असा आरोप त्यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी दोन दिवसांपूर्वी नगर शहरात झाली होती. परंतु लोकार्पण सोहळा करताना कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बदलण्यात आलेला नसून जुन्याच पुतळ्याला रंगरंगोटी करण्यात आली व जनतेची स्वतःच्या स्वार्थासाठी दिशाभूल करण्याचा प्रकार हा नगर शहरातील राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी व शिवसेनेच्या महापौरांनी केला आहे, असे स्पष्ट करून भुतारे म्हणाले, महापौरांनी या सोहळ्याला निधी दिल्याचे शिवसेनेला हे सर्व माहीत असताना दोन दिवस अगोदरच हा सर्व प्रकार जाहीर करणे गरजेच होते. फक्त चित्रपटाच्या गाण्यावर चुम्मा दे गाण्यावर नाचण्यासाठी जनतेचा पैसा असा वाया जात असेल तर शिवाजी महाराज अशा लोकांना माफ करणार नाहीत. महाराजांचा वापर फक्त नाच-गाण्यासाठी राष्ट्रवादी व शिवसेना करते. त्यामुळे कोणीही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत. फक्त स्वतःच्या प्रसिध्दीसाठी सारे सुरू आहे. त्यामुळे या पुढे महाराजांच्या नावाखाली तमाशे भरविण्याचे प्रकार कोणीही करू नये. झालेल्या सर्व प्रकाराबद्दल शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे, असाही सल्ला भुतारे यांनी दिला आहे.

शपथ घ्यायला या…
इम्पिरियल चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आमच्यासह सर्वांनी यापुढे महाराजांसमोर चित्रपटांतील गाणी वाजविणार नाही अशी सामूदायिक शपथ घेण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेणार असून खरेच जर राष्ट्रवादी व शिवसेना पक्षातील पदाधिकारी यांना महाराजांबद्दल व हिंदुत्वाबद्दल आत्मियता, प्रेम असेल तर त्यांनीसुध्दा येऊन अशी शपथ घ्यावी, असे आवाहन भुतारे यांनी केले आहे.

COMMENTS