Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेकायदेशीर सावकारी प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल

फलटण / प्रतिनिधी : फलटण तालुक्यात अवैध बेकायदेशीर खाजगी सावकारी प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात आता तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण तालुक्

तिप्पट पैशाचे आमिष दाखवून मसूरच्या युवकांची 42 लाख रुपयांची फसवणूक
मल्लिकार्जुन मंदिरात शिवभक्तांचा आमरस अभिषेक
महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या अध्यक्ष पदी पी. आर. पाटील

फलटण / प्रतिनिधी : फलटण तालुक्यात अवैध बेकायदेशीर खाजगी सावकारी प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात आता तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचे एका मागोमाग एक गुन्हे दाखल होण्याचा सपाटाच सुरू झाला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातुन मिळलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप भीमराव भोसले (रा. होळ, ता. फलटण) यांनी संशयित आरोपी राजेंद्र वसंतराव जगताप (रा. भिकोबानगर, ता. बारामती) यांच्याकडून नोव्हेंबर 2015 मध्ये दरमहा 7 टक्के व्याजदराने बेकायदेशीररित्या 50 हजार रुपये होळ येथील फिर्यादी भोसले यांच्या घरी घेतले होते. त्याच्या मोबदल्यात फिर्यादीने संशयित आरोपी जगताप यांना डिसेंबर 2015 ते 2017 पर्यंत वेळोवेळी एकूण मिळून 8 लाख 75 हजार रुपये व त्यानंतर सन 2021 मध्ये डिसेंबरमध्ये 50 हजार रुपये मुद्दलाच्या बदल्यात 9 लाख 25 हजार रुपये रोख स्वरूपात देऊनही जानेवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यापर्यंत व्याजापोटी फिर्यादीस आणखी 10 लाख रुपये बेकायदेशीररित्या मागत होता. ते न दिल्यास मुदत खरेदी म्हणून दिलेली जमीन दस्त नावावर करून दे म्हणून धमकी देत होता. तसेच त्याने फिर्यादीस वेळोवेळी व्याजाचे पैशाकरिता शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत होता. व्याजाचे पैसे देण्यास नकार दिल्यानंतर फिर्यादीस बारामती येथे नेऊन 15 लाख रुपयाची बेकायदेशीरपणे नोटरी करून घेतली. राजेंद्र जगताप हा खुनशी असून तो गुंड लोकांना घेऊन फिरत असतो. त्या भीतीपोटी फिर्यादी यांनी आत्तापर्यंत त्याच्याविरुध्द तक्रार दाखल केली नाही. अशी फिर्याद फिर्यादी दिलीप भीमराव भोसले यांनी दिल्याने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात राजेंद्र वसंतराव जगताप विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे करत आहेत.

COMMENTS