Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तहसीलदारांची राजपथ इन्फ्रावर धडक कारवाई: आठ कोटी रॉयल्टी थकविल्याने वाहनांसह मशिनरी सील

औंध / प्रतिनिधी : खटाव तालुक्यातील गोपूज-औंध रस्त्याच्या लगत सुरू असलेल्या राजपथ इन्फ्राच्या प्लांटवर थकीत रॉयल्टीमुळे स्वतः तहसीलदार किरण जमदाडे यां

ए. आर. पवार म्हणजे कोण रं भाऊ : रमाकांत डाके
वीज चोरांविरुध्द कडक मोहीम राबविण्याचे निर्देश
सातार्‍यात वाढदिवसाचा केक रस्त्यावर कापणार्‍या 16 जणांना अटक

औंध / प्रतिनिधी : खटाव तालुक्यातील गोपूज-औंध रस्त्याच्या लगत सुरू असलेल्या राजपथ इन्फ्राच्या प्लांटवर थकीत रॉयल्टीमुळे स्वतः तहसीलदार किरण जमदाडे यांनी धडक कारवाई करत सर्व मशिनरी सील करत वाहनेही जप्त केल्याने एकच खळबळ उडाली असुन या कारवाईचे स्वागत होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, एक वर्षांपूर्वी गौनखनिज उत्खनन ड्रोनद्वारे केलेल्या मोजणीत एक लाख ब्रास उत्खनन केले होते.त्यानंतर संबंधित कंपनीने अंशतः रक्कम भरली होती,त्यानंतर उर्वरित सहा कोटी चाळीस रुपयांचा महसूल रक्कम भरण्यास वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळाला नाही, तर दीड कोटी रुपयांचा तात्पुरता मुरूम परवाना काढून मुरूम उचलूनसुध्दा तीही रक्कम भरली नसल्याने मंगळवारी चारच्या सुमारास स्वतः तहसीलदार किरण जमदाडे, मंडलाधिकारी एन. एन. नाळे, तलाठी जी. एन. पिसे, सपोनि प्रशांत बधे, पोलिस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, बापूसाहेब जाधव, प्रशांत पाटील, काजल साबळे, कुंडलिक कटरे, किरण जाधव, अंकुश पाटील यांच्या पथकाने कारवाई करीत सर्व मशिनरी सील केल्या तर प्लांटवरील चारचाकी वाहने जप्त करण्यात आली.
जनता क्रांती दलाने यापूर्वी केले होते आंदोलन : राजपथ इन्फ्राच्या बेसुमार उत्खननबाबत जनता क्रांती दलाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने यांनी खाणीत उतरून आंदोलन केले होते.

COMMENTS