पाथर्डी आगारातून सत्तर दिवसांनंतर धावली लालपरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी आगारातून सत्तर दिवसांनंतर धावली लालपरी

अभिजित खंडागळे/पाथर्डी : पाथर्डी आगरातुन तब्बल सत्तर दिवसांनंतर पुणे,अहमदनगर या शहरासाठी लालपरी धावल्याने तालुक्यातील प्रवाशांना थोड्या प्रमाणात दिला

कोपरगाव शहरात वाढले चोर्‍याचे प्रमाण
राहत्यात एका सरपंचासह 25 सदस्य बिनविरोध
सत्ता नसतानाही शिवसेना-भाजपाने २०-२५ वर्षे एकत्र राहून काम केले…

अभिजित खंडागळे/पाथर्डी : पाथर्डी आगरातुन तब्बल सत्तर दिवसांनंतर पुणे,अहमदनगर या शहरासाठी लालपरी धावल्याने तालुक्यातील प्रवाशांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.आठ नोव्हेंबर पासून शासकीय विलानीकरण व कामगारांच्या विविध मागण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. तर काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील अकरा आगारापैकी नऊ आगारातून बस सेवा थोड्या प्रमाणात चालू झाली होती.परंतु पाथर्डी आगरातून प्रवाशाकरता बस सेवा सुरू झाली नव्हती.त्यामुळे प्रवाशाना खाजगी वाहनाने प्रवास करताना जास्त पैसे मोजावे लागत होते. पाथर्डी आगारातील अठरा कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.पाथर्डी आगारात सध्या वाहक ९२,चालक १०३ कार्यरत आहेत.त्यातील १० कर्मचारी आज कामावर रुजू झाले असून हळूहळू बाकी कर्मचारी ही कामावर रुजू होतील.तसेच येणाऱ्या दोन तीन दिवसांत लांब पल्याच्या गाड्या ही प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापाक यांनी दिली.

विलीनीकरणाची मागणी न्यायप्रविष्ट आहे.महामंडळाची कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ नये ही आमची प्रामाणिक भावना आहे.सर्व आगार चालू झाले असून पाथर्डी आगारातील कामगारांनीही कामावर रुजू व्हावे असे आवाहन मी करत आहे.

(पाथर्डी आगार प्रमुख; एम.कासार)

COMMENTS