Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाचप्रकरणी कॉन्स्टेबल पोलीस कोठडीत

कोल्हापूर / प्रतिनिधी : बांधकाम व्यावसायिकांकडून 25 हजार रुपये उकळून, त्यानंतरही 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणार्या लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील

राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटना विद्यार्थी दिनी कोमात
तरडगाव येथे मातेकडून चिमुकल्याचा खून
माध्यमे समाजासह राज्यकर्त्यांना दिशादर्शक : ना. चंद्रकांत पाटील

कोल्हापूर / प्रतिनिधी : बांधकाम व्यावसायिकांकडून 25 हजार रुपये उकळून, त्यानंतरही 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणार्या लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल दिग्विजय पांडुरंग मर्दाने (वय 35, रा. शिंगणापूर, ता. करवीर) याला न्यायालयाने मंगळवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, लाचप्रकरणी ‘लक्ष्मीपुरी’ तील वरिष्ठ अधिकार्‍यांचीही चौकशी करण्यात येत आहे, असे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले.

नागाळा पार्क येथील बांधकाम व्यावसायिक अनिल साखळकर याच्याविरुध्द दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी कॉन्स्टेबल मर्दाने याने 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी 25 हजार रुपये यापूर्वी उकळले होते. उर्वरित रकमेसाठी तगादा सुरू होता. अखेर त्यांच्यात 10 हजार रुपयांवर समेट झाला होता. साखळकर यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
पडताळणीअंती मर्दाने याने 25 हजारांची रक्कम यापूर्वी घेऊन पुन्हा 10 हजाराच्या रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सोमवारी त्याला अटक करण्यात आली होती. मंगळवारी त्यास न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाने आदेश दिले.
सायंकाळपर्यंत निलंबन?
लाचप्रकरणी अटक केलेल्या कॉन्स्टेबल दिग्विजय मर्दाने याच्यावर बुधवारी सायंकाळपर्यंत निलंबनाची कारवाई शक्य असल्याचे पोलीस मुख्यालयातून सांगण्यात आले.
दोषी ठरणार्‍यांवर कारवाई करणार
दरम्यान, बांधकाम व्यावसायिक साखळकर याच्याविरुध्द गंभीर गुन्हा दाखल झाला असताना तपास वरिष्ठ अधिकार्‍यांकडे न सोपविता कॉन्स्टेबल मर्दाने याच्याकडे कोणी दिला. दीड महिन्यापूर्वी 25 हजार रुपये उकळण्यात आले. त्यात लाभार्थी कोण आहेत का?, याचीही चौकशी सुरू आहे. यासंदर्भात वरिष्ठाधिकार्‍यांकडे चौकशी करण्यात येत आहे. दोषीविरुध्द कारवाई करण्यात येईल, असेही बुधवंत यांनी सांगितले.

COMMENTS