Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरणच्या अधिकार्‍यांची मनमानी; थकबाकी वसूलीसाठी संपूर्ण विज पुरवठा बंद

शेतकरी आक्रमक; अधिकार्‍याच्या तोंडाला काळे फासण्याचा तयारीतसातारा / प्रतिनिधी : खटाव तालुक्यातील धोंडेवाडी गावात विजबिल वसूलीच्या नावाखाली महावितरणच्

Beed : महावितरणचा गलथान कारभार तार तुटून दोन एकर ऊस जळुन खाक ! (Video)
जास्त उत्पादन घेण्यात ड्रोनचे योगदान मोलाचे ठरणार : प्रतीक पाटील
पुणे प्रादेशिक विभागात कृषिपंप ग्राहकांकडे 12 हजार कोटीचे थकले वीजबिल

शेतकरी आक्रमक; अधिकार्‍याच्या तोंडाला काळे फासण्याचा तयारीत
सातारा / प्रतिनिधी : खटाव तालुक्यातील धोंडेवाडी गावात विजबिल वसूलीच्या नावाखाली महावितरणच्या कर्मचार्‍यांनी मनमानी कारभार सुरु केला आहे. मालदार मसल पॉवरच्या बड्या धेंडांचे आकडे महावितरणच्या तारेला अन् बिलाचा नियमित भरणा करणार्‍या शेतकर्‍यांची कनेक्शन बंद ठेवण्याचा घाट घातला आहे. अर्थात प्रति आकडा दोन हजाराचा मोबदला मिळत असल्याने आकडे काढण्यास टाळाटाळ होत आहे. तर पिके भरात येताच शेतकर्‍यांना अडचणीत आणण्याचा प्रकार सुरु आहे. महावितरणचा मायणी येथील कार्यालयाचा लाटकर नामक अधिकारी त्यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. मात्र, सध्या या लाटकरचा मोबाईल क्रमांक शेतकर्‍यांना दिला जात नाही. तसेच संबंधित लाटकर याने मोबाईल स्विच ऑफ केला असल्याचे सांगण्यात येत आहे.
शेतकर्‍यांनी विजबिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी कायदेशिर मार्ग असताना काही थकबाकीदारांसाठी नियमित विजेचे बिल भरणार्‍या शेतकर्‍यांवर अन्याय होवू लागला आहे. धोंडेवाडी, ता. खटाव येथील चिंचेचा मळा या परिसरातील ट्रान्सफार्मवरील काही शेतकर्‍यांची थकबाकी लाखाच्या घरात आहे. मात्र, उर्वरित शेतकरी नियमित विज बिलाचा भरणा करत आहेत. तरीही सरसकट ट्रान्सफार्मर बंद ठेवण्याचे कृत्य स्थानिक पातळीवर सुरु आहे. याबाबत विचारणा केली असता वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले आहे की, सर्व थकबाकी वसूल झाल्या शिवाय ट्रान्सफार्मरवरून विज पुरवठा केला जाणार नाही. या द्रविडी प्राणायमामुळे नियमित विज बिलाचा भरणार्‍या शेतकर्‍यांना नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. लाटकरांनी हा तोंडी दिलेला आदेश त्यांनी कागदावर देण्याची मात्र, हिम्मत दाखवली नाही. त्यामुळे अशा अधिकार्‍याच्या तोंडाला काळे फासण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. महावितरणने जर बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत विज पुरवठा सुरळीत न केल्यास मायणी येथील कार्यालयातून तोंडी आदेश सोडणार्‍या महावितरणच्या अधिकार्‍याच्या तोंडाला काळे फासण्याचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी नियमित विज बिलाचा भरणा करणारे शेतकरी कोणत्याही महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडे आता दाद मागण्यसाठी जाणार नाहीत. त्यामुळे महावितरणच्या अधिकार्‍यांनी ठरवावे, नियमित विज बिलाचा भरणा करणार्‍या ग्राहकांना सेवा देणार का? तोंडाला काळे फासून घेणार? याबाबतचा चॉईस अधिकार्‍यांच्या हातात आहे. त्यामुळे तात्काळ याबाबत महावितरणने विचार करावा, असे आवाहन शेतकर्‍यांनी केले आहे.

COMMENTS