Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृष्णा साखर कारखान्याकडून उस वाहतूक वाहनांना जीपीएस

कृष्णा कारखान्यात नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आपण करत आलो आहोत. ऊस नोंदणीसाठी मोबाईल अ‍ॅप, ई करार, ई-टेंडरिंग यासारखे नाविन्यपूर्ण प्रयोग पहिल्यां

अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन वर्षे वयाच्या मादी बिबट्याचा मृत्यू
खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी
सोमवारी जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन


कृष्णा कारखान्यात नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आपण करत आलो आहोत. ऊस नोंदणीसाठी मोबाईल अ‍ॅप, ई करार, ई-टेंडरिंग यासारखे नाविन्यपूर्ण प्रयोग पहिल्यांदा कृष्णा कारखान्यात करण्यात आले. त्याचपध्दतीने ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांना जीपीएस प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. ज्यामुळे तोडणी यंत्रणा गतिमान झाली असून ज्याचा फायदा शेतकर्‍यांना व कारखान्यास निश्‍चितपणे होणार आहे.
डॉ. सुरेश भोसले
(चेअरमन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना)

कराड / प्रतिनिधी : य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना सभासद हिताला प्राधान्य देणारा व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारा कारखाना म्हणून महाराष्ट्रात ओळखला जात आहे. चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ सातत्याने शेतकरी सभासदांच्या हितासाठी नवनवीन उपक्रम राबवित असते. आता जीपीएस म्हणजेच ग्लोबल पोसिशन सिस्टीम प्रणालीचा अवलंब ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांसाठी करत कृष्णा कारखान्याने आधुनिकतेकडे आणखी एक पाऊल टाकले आहे.
शेतकर्‍यांचे उत्पादन वाढीसाठी जयवंत आदर्श कृषि योजना, शेतकरी संवाद मेळावे, अल्प दरात द्रवरूप जिवाणू खते, सेंद्रीय खते, माती परिक्षण, सभासदांना मोफत घरपोच साखर यासारखे उपक्रम कारखाना सातत्याने राबवित आहे. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. ज्यामध्ये प्रामुख्याने ई-टेंडर प्रणाली राबविण्यात आली. त्यामुळे टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता आली. आज देशातील नामवंत साहित्य पुरवठादारही यात सहभागी होत आहेत. शेतकरी सभासदांना आधुनिक स्वरूपाचे स्मार्ट कार्ड देण्यात आले आहे. सभासदांना त्वरित साखर, टनेज व बिलांची माहिती स्मार्ट कार्डमुळे मिळत आहे. ऊस नोंदी कृष्णा कारखान्यात मोबाईल अ‍ॅपद्वारे घेतल्या जात आहेत. ज्यामुळे शेतकरी सभासदांच्या ऊस नोंदी अचूकपणे केल्या जातात. ज्यामुळे तोडणी प्रक्रिया पारदर्शकरित्या राबविण्यात येते.
शेतकर्‍यांचा ऊस तुटल्यावर लवकरात-लवकर गाळप व्हावे. या दृष्टिकोनातून कृष्णा कारखान्याने ऊस वाहतुकदारांना यापूर्वीच स्मार्ट कार्ड दिले आहेत. त्यामुळे ऊस गाडी नंबर लावण्यात होणार्‍या गैरप्रकारांना आळा बसला आहे. त्याच बरोबर आता अ‍ॅटोमॅटिक नंबर टेकिंग प्रणालीचा अवलंब कृष्णा कारखाना करत असून यामुळे वेळेची बचत होणार आहे. कृष्णा कारखान्यात जीपीएस प्रणालीचा वापर ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांना केला जात आहे. ही जीपीएस प्रणाली अत्याधुनिक पध्दतीची असून कारखान्याच्या संगणक विभागाने तयार केली आहे.

COMMENTS